Saturday, April 27, 2024
Homeजळगावदूध संघातील संशयितांचा जामीन रद्दसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

दूध संघातील संशयितांचा जामीन रद्दसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघातील (District Milk Union) अपहार प्रकरणात (case of embezzlement) न्यायालयाने (Court) सर्व संशयितांना (suspects) जामीन मंजूर (Bail granted) केला आहे. या संशयीतांचा जामीन रद्द (cancelled) करावा यासाठी पोलीसांनी (police)न्यायालयात धाव (Run to court) घेतली आहे. दरम्यान, शनिवारी त्यांनी कनिष्ठस्तर न्यायालयात जामीन रद्दसाठी अपील दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

जिल्हा दूध संघात अखाद्य बी गे्रड तुपाची विनापरवानगी कमी किंमतीमध्ये केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, प्रशासन प्रमुख चंद्रकांत पाटील, हरी पाटील, निखिल नेहते, किशोर पाटील, अनिल अग्रवाल व रवी अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर सर्व संशयितांना न्यायालयाने जामीन अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला होता. दरम्यान, या जामीनाविरोधात पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यांनी दूध संघातील सर्व संशयितांचा जामीन रद्द व्हावा. यासाठी कनिष्टस्तर न्यायालयात अपील दाखल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सोमवारी पुर्नविचार याचिका दाखल करणार

दूध संघातील अपहार प्रकरणातील संशयितांच्या जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे संशयितांवरील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्याच्या मागणीसाठी सोमवारी पुन्हा वरिष्ठस्तर न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या