Thursday, April 25, 2024
Homeनगरजामखेड येथे दोन गटात दंगल होते तेव्हा.!

जामखेड येथे दोन गटात दंगल होते तेव्हा.!

जामखेड |प्रतिनिधी| jamkhed

सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशनचा दुरध्वनी खनखपला. पुढील व्यक्तीने, जामखेडच्या खर्डा चौक येथे काही दोन समाजातील मुलांचा जमाव जमलेला असून त्यांच्यात दंगल सुरू असल्याचे कळवले. ठाणे अंमलदार यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिली. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमधील उपलब्ध असलेला पोलीस कुमक घेवुन खर्डा चौक येथे धाव घेतली. काही मिनीटात तेथे पोहचून तेथे जमलेल्या युवकांना प्रथम ध्वनीद्वेपकावरून सुचना देण्यात आल्या. ते ऐकत नसल्याने पोलीसांनी हवेत गोळीबार केला. तसेच लाठ्यांचा प्रसाद देत त्यांना पिटाळून लावले. ही धापळ पाहुण घाबरलेल्या नागरीकांना हे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

- Advertisement -

जामखेड येथे आगामी होणार्‍या गणेश उत्सवनिमीत जामखेड पोलीसांनी दंगल नियंत्रणाची रंगीत तालिम केेली. तसेच आगामी सण व गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जामखेड पोलीसांनी शहरातून सशस्त्र संचलन केले. यावेळी प्रात्यक्षिक करते वेळी उद्भवलेल्या प्रसंगाला तात्काळसामोरे जाण्यासाठी दोन पोलीस अधिकारी व पंचवीस पोलीस अंमलदार व सहा होमगार्ड तात्काळ उपलब्ध झाले होते. त्यानंतर तेथेच गर्दी पांगवण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जमाव विसर्जनाचे प्रात्यक्षिक हवालदार रमेश फुलमाळी यांनी पध्दतशीरपणे करून दाखवले. हे प्रात्यक्षिक करते वेळी पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड, सहनिरिक्षक राजू थोरात, जामखेड पोलीस स्टेशनचे 25 पोलीस अंमलदार व 6 होमगार्ड उपस्थित होते. प्रात्यक्षिक करतेवेळी 1 डमी राऊंड फायर करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या