Thursday, April 25, 2024
Homeनगरपोलीस भरती : दुसर्‍या दिवशी 278 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

पोलीस भरती : दुसर्‍या दिवशी 278 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर दुसर्‍या दिवशीही पोलीस चालक पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी 326 उमेदवारांनी हजेरी लावली. यातील 48 उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीमध्ये बाद ठरविण्यात आले. उर्वरित 278 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. दरम्यान दुसर्‍या दिवशी 559 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते.

- Advertisement -

त्यापैकी 326 जण हजर राहिले तर 233 जणांनी दांडी मारली. पोलीस भरतीच्या नगर जिल्ह्यातील 139 जागेसाठी 12 हजार 334 अर्ज दाखल झाले आहेत. आता प्रत्येक्षात मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी चालक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. सोमवारी 200 उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले होते. यातील 48 उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. मंगळवारी 326 उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले होते. त्यातील 48 उमेदवारांना अपात्र ठरविले.

स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. सुरूवातीला उपस्थित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर उंची, छातीचे मोजमाप करण्यात आले. यानंतर गोळा फेक व 1600 मीटर धावणेची चाचणी पार पडली.

आजपासून शिपाई पदासाठी चाचणी

पोलीस भरतीसाठी नगर जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या 129 जागा आहे. या जागेसाठी मैदानी चाचणीला आज बुधवारपासून सुरूवात होत आहे. दररोज एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता मैदानावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कागदपत्रे पडताळणीनंतर छाती व उंचीचे मोजमाप केले जाणार आहे. यानंतर गोळा फेक, 100 मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. 1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव (ता. नगर) शिवारात व्यवस्था करण्यात आली आहे. येथील पोलीस मुख्यालय मैदानावरून अरणगाव येथे जाण्या-येण्यासाठी पाच बसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. 14 जानेवारीपर्यंत ही मैदानी चाचणी चालणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या