Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक१३ ठिकाणच्या अवैध धंद्यांवर पाेलीसांची धाड

१३ ठिकाणच्या अवैध धंद्यांवर पाेलीसांची धाड

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आधिकार पाेलीसांचेच आहे, असे आदेश विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहर पाेलीस आयुक्त दीपक पांडेय यांना देताच, काल दिवसभरात शहर पाेलीसांनी विविध १३ ठिकाणच्या अवैध दारू आणि जुगार अड्ड्यावर छापे टाकले. या कारवाईत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, शहरातील काही आमदारांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोलिसांच्या भूमिकेविषयी तक्रारी करून पोलीस आयुक्तावर निशाणा साधला होता.

तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आधिकार नेमके काेणाचे अशी विचारणा करून आ. देवयानी फरांदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले हाेते.

त्यानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठक घेत हे काम पोलिसांचेच असल्याचे सांगितले होते त्यानुसार बुधवारी पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाया सुरू केल्या दिवसभरात ९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ ठिकाणी छापे टाकले.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ठरल्यानंतर बुधवारी शहर पोलिसांच्या पथकाने १३ ठिकाणी छापे टाकून ३६ संशयितावर कारवाई करून ५३ हजार ४६५ रुपयांची दारू तर ३४ हजार १८० रुपयांचे जुगार साहित्य हस्तगत केले.

या कारवायांत १३ जणांवर महाराष्ट्र दारूबंदी आणि जुगार रायदा कलमान्वये गुन्हे करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या