Sunday, May 5, 2024
Homeनगरटाकळीभान परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

टाकळीभान परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील टाकळीभान (Takalibhan) परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर (Gavthi Hatbhatti Liquor Dens) छापा टाकून (Police Raid) पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टीची दारूचा नाश करण्यात आला. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके (DYSP Sandeep Mitke) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisement -

यावेळी बाळू शहादु मोरे (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) याचेकडून 42,000 रु. किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू (Hatbatti Alcohol) तयार करण्याचे कच्चे रसायन, 2000 रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, संगीता मच्छिंद्र डुकरे (रा. माळेवाडी, टाकळीभान, ता. श्रीरामपूर) हिच्याकडून 38,500 रु. किमतीचे 550 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 1500 रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 84,000 रुपये किमतीचा व वरील वर्णनाचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन (Shrirampur Taluka Police Station) येथे या दोघांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अचानक झालेल्या या कारवाईमुळे टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या