Thursday, April 25, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यातील खेडकर, शेख, बांगर यांना राष्ट्रपती पोलीस पदक

नगर जिल्ह्यातील खेडकर, शेख, बांगर यांना राष्ट्रपती पोलीस पदक

अहमदनगर (प्रतिनिधी) | Ahmednagar –

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलीस पदके जाहीर झाली असून 80 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 215 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 58 पदक मिळाली आहेत.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील हरीश दत्तात्रय खेडकर, (पोलीस निरीक्षक ए.सी.बी अहमदनगर), आणि रऊफ समाद शेख, (सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, अहमदनगर), मूळ अकोले तालुक्यातील शेंडीचे सूर्यकांत गणपत बांगर, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी.बी. मार्गे पोलिस स्टेशन, मुंबई) यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. खेडकर हे मूळ श्रीगोंदा तालुक्यातील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या