Friday, April 26, 2024
Homeजळगावचारित्र्याच्या संशयावरुन निलंबित पोलिसाने केला तलाठी पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन निलंबित पोलिसाने केला तलाठी पत्नीचा खून

पाचोरा – Pachora – प्रतिनिधी :

चारित्र्यावर संशय घेत तलाठी पत्नीचा अवजड वस्तु डोक्यात मारुन पतीनेच हत्या केल्याची घटना शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील मौर्या कन्ट्रक्शन मधील रहिवासी व तालुक्यातील माहेजी येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अरुणा नितीन पवार (वय 42) यांचे भाऊ मुंबई येथे पोलिस दलात सेवेत होते. त्यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.

भावाच्या मृत्यु संबंधीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी अरुणा ह्या मुंबई येथे गेल्या असता त्यांची भेट पोलिस दलात नोकरीस असलेले नितीन मोतीलाल पवार यांचेशी झाला.

नितीन याने अरुणा हिचा विश्वास संपादन करुन माझा पहिला विवाह झाला परंतु माझी पत्नी माझ्या सोबत राहत नाही. मी पण आपल्या समाजाचा आहे असे खोटे सांगुन त्याने अरुणाला विवाहाची मागणी केली. यानंतर त्यांचा 22 सप्टेंबर 2017 मध्ये विवाह झाला होता.

विवाहा नंतर नितीन पवार सतत अरुणा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. अरुणा हिने छळ होत असल्याचा प्रकार तिच्या आईस सांगितल्या नंतर आईने नितीन याच्या स्वभावात बदल होईल असे सांगितले.

अरुणा ही तलाठी पदावर कार्यरत असल्याने तिला कार्यालयीन कामकाजा बाबत फोन यायचे याचा नितीन मनात राग धरून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

याच कारणांमुळे नितीन व अरुणा मध्ये दि. 29 रोजी दुपारी भांडण झाले. त्यात नितीन पवारने पत्नीच्या डोक्यात काहीतरी अवजड वस्तु मारुन खुन केला असे कळते.

पोलिस दलात असल्याने नितीन याने गुन्हा लपविण्यासाठी शेजार्‍यांना खोटं बोलून अरुणा ही घरात पायरी वरुन पाय घसरुन पडली त्यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागून जखमी झाली असे सांगुन अरुणा हिस खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी नितीन यास पोलिसी खाक्या दाखवीला. नितीन याने मीच अरुणा हिचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या