Wednesday, April 24, 2024
Homeनगरपोलीस निरीक्षक बडाख यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव

पोलीस निरीक्षक बडाख यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव

माळवाडगाव (वार्ताहर) –

श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठच्या महांकाळवाडगावचे सुपूत्र ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाइंदर,वसई – विरार पोलिस आयुक्तालयातील

- Advertisement -

गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांचा गुन्हे तपासातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांचे हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.

पोलीस सेवेत पोलीस उपनिरीक्षक पदावर रूजू झाल्यानंतर रत्नागिरी, खालापूर, पनवेल येथे गुन्ह्याचे तपासकामी उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेत पोलीस प्रशासनाने पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती करून ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात गुन्हे अन्वेषण शाखेची जबाबदारी सोपविली. गेली दोन वर्षांत गुन्हे अन्वेषण शाखेतही त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. अनेक परप्रांतीय गुन्ह्याचे तपासात मोलाची कामगिरी बजावून गुन्हेगारांना जेरबंद केले. दिवाळीच्या पुर्वसंध्येला विरार येथे महिंद्राकोटक बँकेची ड्रायव्हरने 4.5 कोटी रक्कम असलेली (एटीएम) कॅश व्हॅन पळविली होती.या तपासातही बडाख यांनी मोलाची कामगिरी बजावली.

अलीकडेच नयानगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा र.नं.14/2021 या दरोड्याचा तातडीने तपास लावून मुद्देमालासह आरोपीस जेरबंद केले. या त्यांच्या कार्याची दखल घेत पोलिस प्रशासनाच्यावतीने पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी प्रशंसापत्र देऊन गौरव केला. प्रमोद बडाख हे श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक विश्वनाथ मुठे यांचे भाचे असून त्यांचे शालेय शिक्षण मुठेवाडगांव येथे झाल्याने मोठा मित्रपरिवार आहे. या मित्रपरिवारासह महांकळवाडगांवचे ग्रामस्थ, तरूण मंडळे यांनी प्रमोद बडाख यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या