Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारलुट करणार्‍या तिघांना पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी रंगेहाथ पकडले

लुट करणार्‍या तिघांना पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी रंगेहाथ पकडले

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार-निझर रस्त्यावर आयशरवर दगडफेक करत चालकाची लुट करणार्‍या तिघांना गस्तीवर असणार्‍या उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी रंगेहाथ पकडले. तिघांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जामनेर तालुक्यातील पहूर येथुन आयशर (क्र.एम.एच.19-सी.वाय.1965) यात कापूस भरून गुजरात राज्यातील कडी गावात विक्रीसाठी निघाली होती.

रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सदर आयशर गाडी नंदुरबारकडुन निझरकडे जात असतांना हॉटेल जे.के.पार्कच्या पुढे रस्त्यावर पल्सर मोटारसायकल आडवी लावून आयशर गाडीवर दगडफेक करीत काचा फोडल्या.

यावेळी चालक समाधान रामचंद्र सोनवणे रा.लोहार ता.पाचोरा याच्या खिश्यातून तिघा युवकांनी बळजबरीने हजार रूपये काढुन घेतले.

त्याचवेळी गस्तीवर असलेले उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना आशयर चालकाची लुट होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आयशर गाडीजवळ जात लुट करणार्‍या तिघांना रंगेहाथ पकडले.

आयशरचालक समाधान सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गोरख रतिलाल ठाकरे, राकेश रोहिदास ठाकरे, मनिष उर्फ बॉबी महादेवराव ठाकरे (तिन्ही रा.घुली ता.नंदुरबार) यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरख रतिलाल ठाकरे, राकेश रोहिदास ठाकरे, मनिष महादेवराव ठाकरे या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, हे.कॉ. सरदार, हे.कॉ. वळवी, पो.कॉ. गावडे, पोना साळुंखे, एपीआय निळे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या