Thursday, April 25, 2024
Homeजळगावपोलीस निरीक्षक बकाले निलंबित

पोलीस निरीक्षक बकाले निलंबित

जळगाव । Jalgaon

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोनि बकाले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला आहे. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात येवून बकालेंना निलंबन करण्यात आले आहे.

- Advertisement -

Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा…!Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा…!

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व अशोक महाजन या दोघांमध्ये संभाषणाची ऑडीओ क्लिप भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे आली होती. यामध्ये पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जावून आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ही ऑडीओ क्लिप आ. चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे सादर करीत बकालेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांनी बकाले यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली होती. परंतु बुधवारी दिवसभरात ही ऑडीओक्लिप संपुर्ण समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यामुळे समाजातून संतप्त भावना उमटू लागल्या होत्या.

पोलिसांनीही व्यक्त केल्या संतप्त भावना

वरिष्ठ अधिकार्‍याचे आणि कर्मचार्‍याचे ऑडीओ क्लिपमधील संभाषण व्हायरल झाल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली होती. दरम्यान, पोलीस दलातील कर्मचार्‍यांकडून बकालेंच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला जात होता.

रिक्तजागेवर लागणार यांची वर्णी

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. त्यांनतर रात्री उशिरा त्यांचे निलंबन करण्यात आले.त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे. दरम्यान, त्यांच्या जागेवर चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या नावाची चर्चा पोलीस दलात सुरु होती. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत कुठलेही आदेश काढण्यात आले नव्हते.

अन् तडकाफडकी कारवाईला प्रारंभ

पोलीस अधिकार्‍याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा संपुर्ण समाजातून प्रचंड रोष व्यक्त केला जात असल्याने पोलीस अधीक्षकांनी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार तत्काळ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी तयार करुन तो नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर पाटील यांच्याकडे सादर केला. रात्री उशिरा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढण्यात आले.

Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा…!

- Advertisment -

ताज्या बातम्या