Wednesday, April 24, 2024
Homeजळगावलॉजेसमधील गैरकृत्य टाळण्यासाठी मालकांना पोलिसांकडून तंबी

लॉजेसमधील गैरकृत्य टाळण्यासाठी मालकांना पोलिसांकडून तंबी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहरातील रस्त्यावरील लॉज व हॉटेलांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैधरीत्या देहविक्री व्यवसायासह तरुण-तरुणींची गैरकृत्ये सुरू असल्याबाबतची सविस्तर बातमी दि,१० में रोजी दै, देशदूतमध्ये प्रकाशीत करण्यात आली होती. त्या बातमीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया समाजात उमटल्याने, परिणामी शहरातील सर्व लॉजेसमधील गैरकृत्य टाळण्यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनतर्फे काल (दि,२७) लॉज व कॅफे मालकांची बैठक घेवून त्यांना तंबी देत, योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीमुळे आता लॉजेसमधील गैरकृत्यांना नक्कीच आळा बसणार आहे. त्यामुळे पोलिसांसह देशदूतच्या बातमीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

- Advertisement -

शिक्षणाचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणार्‍या चाळीसगांव शहरात ग्रामीण भागातील विद्यार्थी -विद्यार्थीनी मोठया प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. सोशल मिडीया माध्यमाचा उपयोग काही विद्यार्थी स्वत:ची प्रगती साधण्यासाठी करत आहेत. परंतु काही त्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग सुध्दा करत आहेत. मागील काही दिवसांपासुन लॉजेस/कॅफे मध्ये तरुण मुलां-मुलीचे वाढते प्रमाण पाहुन त्याला वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याने काल दिनांक २५/०५/२०२३ रोजी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे शहरातील सर्व लॉजेस/कॅफे मालक/चालक यांची बैठक पोलीस निरिक्षक संदिप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. चाळीसगांवच्या शैक्षणीक वाट्याला गालबोट न लागु देण्याची वेळीच गैरकृत्यांना आवर घालणे गरजेचे असल्याने ही जबाबदारी सर्व लोकांचीच आहे, असे पो.नि.संदीप पाटील यांनी सर्व लॉजेस/कॅफे मालक/चालक यांना सांगुन त्यांना त्यांचे जबाबदारीची जाणीव करुन दिली.

जुन-२०२३ पासुन नविन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्याआधी सर्व लॉज/कॅफे चालकांना पो.नि.संदीप पाटील यांनी सुचना दिल्या त्यात प्रामुख्याने लॉजेस/कॅफे मध्ये तरुणांना आधारकार्ड किंवा ओळखीच्या पुराव्याशिवाय प्रवेश न देणे, विनाकारण बसु न देणे, संशयीत इसमांबाबत अधिक ओळखीबाबत पुरावा घेणे, तसेच पो.स्टे.ला माहीती देणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे इतर सुचना देण्यात आल्या. तसेच लॉजेसमध्ये अल्पवयीन मुलां-मुलींना प्रवेश न देणे अशी सुचना करतांना तसा प्रकार आढळुन आल्यास सदर लॉज / कॅफे मालक/चालकांवर पोस्को तसेच भादंवि.प्रमाणे गुन्हा दाखल करणार अशी माहीती देवुन लॉजमध्ये महिला/मुलींना गैरकृत्यासाठी न ठेवणे याबाबत पिटा ऍक़्ट अंतर्गत सदर मालक/चालकांवर कारवाई करणार असल्याची सुध्दा माहीती दिली. कॅफे चालकांनी आपले कॅफेमधील अंतर्गत रचना नगरपालीकेकडुन परवानगी घेवुनच तयार करावी.सदर कॅफेमध्ये गैरकृत्य आढळल्यास नगरपालीकेला सदर कॅफेवर कायद्याअंतर्गत कारवाई करणेबाबत पत्र देणार असल्याची माहीती पो.नि.संदीप पाटील यांनी दिली. जुन-२०२३ पर्यंत सर्व कॅफे चालक/मालक यांनी संबंधीत विभागाकडुन सर्व परवानग्या बाळगणे आवश्यक असल्याते सांगुन सर्व लॉज/कॅफे यांची यापुढे कडक तपासणी मोहीम राबवुन कार्यवाही करणार असल्याचे सांगुन तो पर्यंत परवानगी प्राप्त करणेकामी अवधी दिल्याचे सांगीतले.

पोलीसांनी दिलेल्या सुचनांना सर्व लॉजेस/कॅफे चालक/मालक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी त्यांना कोणतेही प्रकारचे गैरकृत्यांला प्रोत्साहन न देणेकामी सीआरपीसी-१४९ प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. पोलीसांनी जुन-२०२३ पासुन सुरु होणार्‍या शैक्षणीक वर्षासाठी पोलीस स्टेशनचे वतीने मार्गदर्शनपर शिबीर घेण्याचा मानस ठेवला असुन त्यात युवा वर्गास रोजगार मार्गदर्शन, लैगींक विषयाबाबत जागृकता, तरुणींना आत्मनिर्भरतेचे धडे अशे उपक्रम सुरु करणार असल्याचे सांगुन पालकांनीही आपले मुलांबाबत सजग राहणेकामी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. मोबाईलचा विद्यार्थ्यांमध्ये वाढता वापर व त्याचे दुष्पपरिणामांबाबत पालकांनी स्वत:चे मुलांशी कौटुंबिक संवाद साधण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास व पोलीसांची गरज असल्यास नि:संकोचपणे पोलीस स्टेशनला भेटुन समस्या सांगण्याबाबत पोलीसांकडुन आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या