Friday, April 26, 2024
Homeनाशिकपोलीस कोविड सेंटरमधील रुग्ण सूर्यस्नानाने होतायेत बरे; काय आहे संकल्पना?

पोलीस कोविड सेंटरमधील रुग्ण सूर्यस्नानाने होतायेत बरे; काय आहे संकल्पना?

नाशिक | प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये पोलीस दलामधील अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुंटुंबीयांना चांगल्या दर्जाच्या वैदयकीय सुविधा त्यांच्या हक्काच्या ठिकाणी मिळवुन देण्यासाठी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. हे कोविड सेंटर करोनाच्या दुसऱ्या लाटेतही सुरु करण्यात आले असून सूर्यस्नान आणि फलाहार आणि पौष्टिक आहारामुळे येथील रुग्ण लवकर बरे होण्यास मदत झाली आहे.

- Advertisement -

या कोविड सेंटरमध्ये पुरूषांसाठी 60, महिलांसाठी 40 अशा 100 बेडची सुविधा करण्यात आली असुन, त्यात 6 आॅक्सिजन बेड देखील रूग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत 1 हजार 8 अंमलदारांच्या नातेवाईकांची रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली असुन, त्यात 262 रूग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये 90 कोविड रूग्ण दाखल झाले असुन 69 रूग्ण पुर्णतः बरे होवुन घरी परतले आहेत.

कोविड रूग्णांना ट्रिटमेंट प्रोटोकाॅल सोबतच दिल्या जाणाऱ्या डाएटचा तसेच व्यायामाचा/सुर्यस्नानाच्या फायदयाचा अभ्यास करून त्यात सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपावेतो सकाळचे सुर्यस्नान, केळी द्राक्ष इ.फळांचा नास्ता, अनुलोम-विलोम प्राणायाम, वरण, वरईचा भात, नाचणीची भाकरी, उकडलेली भाजी (फक्त हळद व काळी मिरी टाकुन), सलाद असे जेवण, सायंकाळी पुन्हा सुर्यस्नान, रात्रीच्या जेवणामध्ये केळी, द्राक्ष इ.फळे व हळद, काळी मिरी पावडरसह दुध अशा प्रकारचा व्यायाम व डाएट ठेवण्यात आला आहे.

सर्व रूग्णांसाठी दैनंदिन योगामध्ये ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन, शवासन, सुर्यनमस्कार, शंशकासन, जलनेती व प्राणायामामध्ये नाडीशोधन प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम व संध्याकाळी सुर्यास्तानंतर संक्षिप्त योगनिद्रा असा व्यायाम देण्यात येत आहे.

श्वसनक्रियेची क्षमता तपासण्यासाठी सहा मिनीटे चालण्याची चाचणी घेवुन रग्णाची पुढील उपचाराची दिशा ठरविली जाते. याप्रमाणे वैदयकीय पथकास कोविड रूग्णांवर उपाचार करण्याबाबत पोलीस आयुक्त पांडेय नियमित मार्गदर्शन केले असुन, त्याचा रूग्णांना अंत्यत फायदा होतांना दिसुन येत आहे. अदयाप कोणीही रूग्ण क्रिटीकल झालेला नाही हे विशेष असल्याचे पांडे सांगतात.

सध्या ’’पोलीस कोविड केअर सेंटर’’ मध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे नातेवाईक असे 13 पुरूष व 8 महिला असे एकुण 21 कोविड रूग्ण उपचार घेत आहेत. या रूग्णांना दररोज सकाळ व संध्याकाळ सुर्यस्नान दिले जाते.

त्यासोबतच त्यांच्याकडुन जलनेती, योगासने इ. व्यायाम करून घेतले जातात. त्यांची सहा मिनीटांची वाॅकटेस्ट घेवुन, आॅक्सिजन लेव्हल चेक केली जाते व त्यानुसार पुढील उपचाराची दिशा ठरविली जाते.

नियमीत सुर्यस्नान घेतल्याने सुर्यप्रकाशामुळे शरिरातील कोलेस्टराॅलचे ’’डी’’ जिवसत्वामध्ये रूपातंर होते ’’डी’’ जिवनसत्वामुळे रक्तामध्ये असलेले कॅल्शीअमचे चयापचय (Metabolism) होवुन हाडे व स्नायु मजबुत होतात.

सुर्यप्रकाशामुळे शरीरात सेेरेटोनिन नावाचे हार्मोन्स श्रावते व त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकुन राहण्यास मदत होते. सुर्यप्रकाशामुळे पिनीअल ग्रंथीमधुन दिवसा मेलॅनिन व रात्री मॅलॅटोनिन नावाचे हार्मोन श्रावते त्यामुळे माणसास शांत झोप लागते.

अशाप्रकारे सुर्यस्नान कोरोनाच्या रूग्णांसाठी अतिशय लाभदायक असुन, ते कोरोनाच्या रूग्णांसाठी लस पण आहे आणि औषधपण आहे.

मी व इतर अंमलदार व त्यांचे नातेवाईक पोलीस कोविड केअर सेंटर, पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे उपचार घेत असुन, पोलीस आयुक्तांनी वैदयकीय पथकास दिलेल्या सुचनेनुसार आम्हांस अंत्यत उच्च प्रतिच्या वैदयकीय सुविधे सोबतच कोरोना आजारास उपयुक्त असे डाएट व व्यायाम दिला जात आहे. तसेच सकाळ संध्याकाळ सुर्यस्नान दिले जाते त्यामुळे रूग्ण लवकर बरे होत आहोत. मला देखील आमचे या हक्काच्या कोविड सेंटरमध्ये अंत्यत चांगले उपचार, आहार व व्यायाम मिळत आहे. मी स्वतःला माझे कुंटुंबातच असल्यासारखे समजत आहे.

पोलीस अंमलदार निलेश वाघमारे नेम नाशिकरोड पोलीस स्टेशन

- Advertisment -

ताज्या बातम्या