Friday, April 26, 2024
Homeनगरपोलीस बंदोबस्तात ‘लालपरी’ मारतेय नेवासा ते शेवगाव फेर्‍या

पोलीस बंदोबस्तात ‘लालपरी’ मारतेय नेवासा ते शेवगाव फेर्‍या

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा बसस्थानकातून नेवासा ते शेवगाव बससेवा सुरू झाली. यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी व एसटी महामंडळाचे अधिकारी यांच्या चोख बंदोबस्तात ही बस सेवा सुरू झाली.

- Advertisement -

रविवारी सकाळी नेवासा ते शेवगाव बस रवाना झाली. यावेळी बसस्थानकात शुकशुकाट होता. मात्र पुढे बस गेल्यानंतर बस स्टॉपवरती प्रवाशांची चढ-उतार सुरू झाली.

पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे गणेश गलधर हे नेवासा फाटा येथे बस पासिंगसाठी कर्तव्य पार पाडत आहेत. तसेच महामंडळाचे अधिकारी देखील शासकीय वाहन घेऊन बसच्या पाठीमागे आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावर लालपरी धावत असल्याने नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या