Thursday, April 25, 2024
Homeनगरअपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

पाथर्डी ( तालुका प्रतिनिधी) –

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोलिस दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेले पोलिस कॉन्स्टेबल संपत रतन एकशिंगे

- Advertisement -

यांचे आज मंगळवारी दुपारी अपघाती निधन झाले. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी की,शेवगाव पोलिस ठाण्या अंतर्गत असलेल्या बोधेगाव दूरक्षेत्र येथे कार्यरत असलेले व पाथर्डी तालुक्यातील माळेगाव येथील कायम रहिवाशी असलेले पो.कॉ.संपत एकशिंगे हे आज मंगळवारी दुपारी कामानिमित्त बोधेगाव येथून पाथर्डीकडे चारचाकी वाहन स्वतः चालवत जात होते.

पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी फाटा परिसरात त्यांचा वाहनावरील ताबा सुटला व वाहन झाडावर जाऊन आदळल्याने अपघात झाला.त्या अपघातात त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला.बोधेगाव पोलिस दूरक्षेत्र येथे कार्यरत असतांना त्यांनी गोरगरिब व सर्वसामान्य जनतेची कामे त्यांनी प्रामाणिकपणे केली.एखादा वाद पोलिस ठाण्यात आला तर तो तेथेच मिटवून शांतता व सलोखा राखण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.

माळेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार रतन एकशिंगे यांचे ते सुपुत्र होते तर अहमदनगर येथील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे व येरवडा ( पुणे) येथील पोलिस उपनिरीक्षक संदिप एकशिंगे यांचे ते लहान बंधु होते.त्यांचा स्वभाव अत्यंत शांत,संयमी,मनमिळावु होता त्यांना मोठा मित्रपरिवार होता त्यांच्या निधनाचे वृत्त पाथर्डी तालुक्यात व बोधेगाव परिसरात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या