Friday, April 26, 2024
Homeनाशिकग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

लासलगाव शहरासह लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत 15 जानेवारीला होणार्‍या 14 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मार्गावरून सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. शर्मिष्ठा घारगे वालावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील 14 ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी लासलगाव शहरातील नुरानी मशीद, संजय नगर, बाजारतळ, जामा मशीद, श्रीराम मंदिर, कोटमगाव त्रिफुली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरात पोलीस संचलन करण्यात आले.

या संचलनात लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तांबे, दंगा नियंत्रण पथकातील 20 जवान तसेच 25 पोलीस अंमलदार उपस्थित होते. या संचालनाचे नियोजन पो.ना. कैलास महाजन व प्रदिप आजगे यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात संचलन केल्यानंतर लासलगाव पोलीस ठाण्यात या संचलनाचा समारोप करण्यात आला.

सिद्धपिंप्रीत संचलन

यावेळी जवळपास 100 पोलीस दलाने संपूर्ण गावात फेरी काढुन मार्गदर्शन केले. अनुचित प्रकार घडू नये आणि निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडावी यासाठी यावेळी कधी नाही इतकी गुप्तता पाळून अचानक आलेल्या पोलीस ताफ्याने वातावरण शांत झाले होते. ग्रामस्थांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती. घुगे, स्थानिक पोलीस पाटिल कैलास ढिकले, तालुका पोलीस स्टेशनचे पटेल, गायधनी आदींसह स्पेशल अ‍ॅक्शन फोर्सचे 25 जवानांसह बहुसंख्य पोलीस व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्या यासाठी तालुक्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या वतीने प्रमुख गावात संचलन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या