Friday, April 26, 2024
Homeनगरलाच स्वीकारताना दोन पोलीस रंगेहाथ पकडले

लाच स्वीकारताना दोन पोलीस रंगेहाथ पकडले

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शिर्डी ते गुजरात मार्गावरून चालणार्‍या वाळूच्या गाड्यांना मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विनाविघ्न प्रवास करावयाचा असेल

- Advertisement -

तर 1 हजार रुपयांची लाच मागणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी लाच स्किारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी केली.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तक्रारदार यांच्या वाळुच्या तिन ट्रक अधिकृतपणे गुजरात ते शिर्डी अशी वाळू वाहतूक करतात. या ट्रक मनमाड शहर पोलीस ठाणे हद्दीतून पास होताना त्यांची अडवणूक करून काही कायदेशीर कारवाई न करणे करिता आरोपी पोलीस नाईक संतोष बाळू पागी, पोलीस हवालदार दिलीप बाजीराव निकम, यांनी तक्ररदार यांचेकडे 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

ती लाचेची रक्कम सोमवारी मनमाड शहरातील मनमाड चौफुली येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष आरोपी संतोष बाळू पागी यांनी स्विकारली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले व आरोपी पोलीस हवालदार दिलीप बाजीराव निकम यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक, सुनील कडासने, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शाम पवरे, पोलिस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर, पर्यवेक्षण अधिकारी हरीष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला प्र वि अहमदनगर यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या