Friday, April 26, 2024
Homeनाशिकघाटनदेवी चेकपोस्टवर इगतपुरी पोलीसांचा कडक बंदोबस्त

घाटनदेवी चेकपोस्टवर इगतपुरी पोलीसांचा कडक बंदोबस्त

इगतपुरी । Igatpuri

राज्य शासनाच्या जिल्हाबंदी आदेशान्वये मुंबई आग्रा महामार्गावरील घाटनदेवी परीसरात चेकपोस्ट उभारण्यात आला असून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी इगतपुरी पोलीसांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरहद्दीवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातुन वाहने नाशिकच्या दिशेने येत असल्याने घाटनदेवी जवळ चेकपोस्ट उभारण्यात आला आहे.

इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वाखाली २४ तास पोलीस बंदोबस्तात वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक समाधान नागरे स्वता तळ ठोकुन असुन मुंबईहुन नाशिकला जाणारे व नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या खाजगी वाहनांची कडक तपासणी येथे करण्यात येत आहे. योग्य कारणांशिवाय कोणतेही वाहन परजिल्हयात सोडले जात नाही.

दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने जिल्हा बंदीचे आदेश जाहीर केले आहे. मुंबई नाशिक महामार्गावर घाटनदेवी येथे चेकपोस्ट उभारण्यात आला असून येथे २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नवले, गोपनीय विभागाचे राजू चौधरी, मुकेश महिरे, राहुल साळवे, के. डी. फासले यांच्यासह होमगार्डचे अजय धांडे, विजय धांडे, जखिरे, ठवळे आदी कार्यरत आहेत.

चेकपोस्टवर नाशिकहुन मुंबईला जाणारी व मुंबईहुन येणारी खाजगी वाहनांची कसुन तपासणी सुरु असुन सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक कारण असलेल्या वाहनानांच सोडले जात आहे.

विनाकारण प्रवास करणाऱ्या वाहनांना परत माघारी पाठवले जात आहे. वाढते कोरोना रुग्णांमुळे जिल्हाबंदीचा आदेश असल्यामुळे नागरिकांनीही सहकार्यकरून विनाकारण घराबाहेर पडु नये.

– समाधान नागरे, पोलीस निरीक्षक, इगतपुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या