Friday, May 10, 2024
Homeजळगाव5 हजारांची लाच घेताना पोलीसाला रंगेहाथ अटक

5 हजारांची लाच घेताना पोलीसाला रंगेहाथ अटक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तक्राराकडे गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 5 हजारांची लाच घेताना गुरुवारी नशिराबाद पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल सतिष रमेश पाटील (वय 43) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून अटक केली.

- Advertisement -

तक्रारदाराने ही तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती. दि. 8 ऑक्टोबर रोजी आरोपीने स्वत: 5 हजारांची रक्कम स्विकारताना पथकाने रंगेहात पकडून रक्कमही हस्तगत केली आहे.

पाळधीच्या तक्रारदाराविरुद्ध असलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आरोपीने दि. 8 रोजी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 5 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः स्वीकारली.

ही कारवाई नशिराबाद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. या पथकात अँन्टीकरप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकुर, पो.नि.संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार रवींद्र माळी, पोहेकॉ. अशोक अहिरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, पोना.सुनिल शिरसाठ, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पोकॉ.प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांचा समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या