Friday, April 26, 2024
Homeधुळेहत्यारे घेवून धुळ्याकडे येणारी टोळी गजाआड

हत्यारे घेवून धुळ्याकडे येणारी टोळी गजाआड

धुळे । प्रतिनिधी dhule

इंदूर (Indore) येथून विविध हत्यारे घेवून धुळ्याकडे जात असलेल्या दहा जणांच्या टोळक्याला शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांच्या (police) पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) हाडाखेड चेकपोस्टवर पकडले.

- Advertisement -

त्यांच्याकडून तलवारी, गुप्ती, चॉपर, चाकू, फाईटरसह कार असा एकुण सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपी धुळे तालुक्यातील लळींग आणि जुन्नेर गावातील रहिवासी आहेत. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत या कामगिरीबद्दल सपोनि सुरेश शिरसाठ यांच्यासह पथकाला 10 हजाराचे रोख बक्षिसही जाहिर केले.

ही कारवाई पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, शिरपूर शहरचे पोलिस निरीक्षक अंन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोहेकॉ. जाकीरोद्दीन शेख, चत्तरसिंग खसावद, पवन रामचंद्र गवळी, संजय काशिनाथ सूर्यवंशी, आरिफ पठाण, पोना संदीप शिंदे, रोहिदास पावरा, पोकॉ योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारुकी यांच्या पथकाने केली.

पांढर्‍या रंगाच्या कारमधून काही जण इंदूरकडून धुळ्याकडे शस्त्रसाठा घेवून जात असल्याची गोपनिय माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार सपोनि शिरसाठ यांच्यासह पथकाने हाडाखेड तपासणी नाक्याजवळ नाकाबंदी केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास संशयीत कार (क्र.एमएच 04 एफ.झेड. 2004) हाडाखेड तपासणी नाक्याजवळ येताच पोलिसांनी तिला रोखले. कारमधील दहा संशयीतांना खाली उतरवुन कारची तपासणी केली असता त्यात 12 तलवारी, दोन गुप्त्या, एक चॉपर बटन घडीचा चाकू, दोन फाईटर अशी हत्यारे मिळून आली. त्यामुळे पोलिसांनी हत्यारांसह कार असा 6 लाख 29 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कारमधील दहाही जणांना ताब्यात घेतले. सतपाल गिरधर सोनवणे (रा.लळींग), किरण नंदलाल मराठे (रा.जुन्नर), विकास देवा ठाकरे, सकाराम रामा पवार दोघे (रा.लळींग), सचिन राजेंद्र सोनवणे (रा.अवधान), राजू पवार, अमोल शांंताराम चव्हाण, संतोष नामदेव पाटील तिघे (रा.जुन्नेर), विशाल विजय ठाकरे, विठ्ठल हरबा सोनवणे दोघे (रा.लळींग) यांच्याविरोधात भारतीय हत्त्यार कायदा कलम 4/25 सह मुंंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या