Thursday, April 25, 2024
Homeधुळेपोलिसांच्या सतर्कता, रोकडसह दागिने मिळाले परत

पोलिसांच्या सतर्कता, रोकडसह दागिने मिळाले परत

धुळे Dhule । प्रतिनिधी

येथील मोहाडी पोलिसांच्या (Mohadi Police) सतर्कता (alert) आणि प्रामाणिकतेमुळे महिलेला (woman) तिची रोकडसह दागिन्यांची पर्स (Jewelry purse with cash) परत मिळाली आहे. कारमधून प्रवासादरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra highway) लळींग घाटात (Laling Ghat) ही पर्स पडली होती.

- Advertisement -

मोहाडी पोलीस ठाण्याचे असई बापू दाभाडे, पोना बाबुलाल माळी, पोकॉ. मुकेश जाधव हे 20 ऑगस्ट रोजी लळींग घाट परिसरात दुचाकीने पेट्रोलिंग करत होते. तेव्हा त्यांना दोन जणांमध्ये पैशांच्या वाटणीवरून वाद सुरु असल्याचे कळाले. तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी केली. त्यांच्याकडे रोकड आढळून आली.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांना रस्त्यावर एक पर्स सापडली असून त्यात त्यांना ऐवज सापडल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड व पर्स पोलीस ठाण्यात आणली. जमा केलेल्या ऐवजात 72 हजार 635 रुपये रोख, 52 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5 हजार किंमतीचे 7 भार वजनाचे चांदीच्या दागिन्यांचा समावेश होता. तसेच पर्समध्ये मेडिकल बीलही सापडले. त्यावर मोबाईल क्रमांक दिलेला होता.

त्या क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो क्रमांक येवला येथील एका मेडिकल चालकाचा होता. त्याला बिलावरील नावासंदर्भात विचारले असता त्यांनी संबंधितांचा मोबाईल क्रमांक दिला. त्यावरुन ती पर्स सौ. आशा दिलीप मंडलेचा (रा. येवला) यांची असल्याचे निष्पन्न झाले. मंडलेचा परिवार दि.20 ऑगस्ट रोजी पहूरहून येवला जाण्यासाठी आपल्या कारने निघाले होते.

लळींग घाट परिसरात त्यांच्या नातवाला लघुशंका लागली असता त्यांनी गाडी थांबविली. तेव्हा तेथेच पर्स पडली. मात्र, मालेगावला गेल्यानंतर पर्स गहाळ झाल्याचे मंडलेचा यांच्या लक्षात आले. त्यांना पर्स परत मिळेल, अशी कुठलीही अशा उरलेली नव्हती. मात्र, मोहाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पर्स मंडलेचा यांना परत मिळाली. त्यानुसार त्यांना ऐवज घेण्यासाठी आज धुळ्यात बोलविण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते दिलीप मंडलेचा, (रा. येवला, जि.नाशिक) यांना त्यांचा ऐवज परत करण्यात आला. मोहाडी पोलिस ठाण्याचे सपोनि भूषण कोते यांच्या मार्गदर्शनाखाली असई बापू दाभाडे, पोना बाबुलाल माळी, मुकेश जाधव यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीने पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या