Thursday, April 25, 2024
Homeनगरयुवकाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली

युवकाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उसने मागितलेले पैसे दिले नाही म्हणून युवकाच्या डोक्यावर, मानेवर बिअरच्या बाटलीने वार करून जखमी केले. मोहसीन रफिक पठाण (वय 23 रा. मोमीनपुरा, बीड) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 23 जून रोजी सायंकाळी अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील पोखर्डी (ता. नगर) शिवारातील हॉटेल चंद्रकांत येथे ही घटना घडली.

- Advertisement -

मोहसिन पठाण याच्यावर उपचार सुरू असताना त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून रविवारी (दि. 26) सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. फारूख नबी शेख (रा. मोमीनपुरा, बीड), आरबाज सादिक शेख व सलमान सादिक शेख (दोघे रा खासबाग, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 23 जून रोजी सायंकाळी मोहसिन पठाण व आरीफ शेख पोखर्डी शिवारातील हॉटेल चंद्रकांत येथे जेवण करत होते.

तेथे फारूख शेख, आरबाज शेख आणि सलमान शेख आले. फारूखने मोहसिन यांच्याकडे उसने पैसे मागितले असता मोहसिनने त्याला सांगितले,‘मी कामाकरिता मुंबई येथे जात असून माझ्याकडे पैसे नाहीत’, असे म्हणताच रागवलेल्या फारूख, आरबाज व सलमान यांनी मोहसिनला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

फारूखने बिअरच्या बाटलीने मोहसिनच्या डोक्यावर, मानेवर डाव्या बाजूवर जबर मारहाण केली,‘तू जर आमचे विरूध्द पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक गांगर्डे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या