Friday, April 26, 2024
Homeधुळेछंदाचे नाते आत्म्याशी जुळते तेव्हा काव्य बनते

छंदाचे नाते आत्म्याशी जुळते तेव्हा काव्य बनते

धुळे Dhule । प्रतिनिधी

निसर्गातील गरुड दृष्टीतून कालिदासांनी (Kalidasa) सारं काही टिपलं आहे. काव्यातील भावगर्भता (Emotion in poetry) व देखणेपणा हा शब्दांकडून सम्राटासारखा अर्थाचा कारभार वसूल करून घेतो. छंदाचे नाते (Hobby relationship) जेव्हा आत्म्याशी जुळते (Aligns with the soul) त्यातून काव्य निर्माण होते. हेच म्हणजे मेघदूत (cloud messenger) होय, असे प्रतिपादन प्रा.वैशाली पाटील यांनी केले.

- Advertisement -

मराठा सेवा संघ प्रणित, संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे साक्री रोडवरील विशाल सोसायटी नगरात आषाढ महिन्यात महाकवि कुलगुरू कालिदास दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा.वैशाली पाटील यांनी कुलगुरू कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे रसग्रहण केले.

आषाढ महिना म्हटलं की, समस्त विश्वातील साहित्यिकांना आठवण होते ती कालिदासाच्या मेघदूताची. भारतीय साहित्यातील सुवर्णपान ज्यांचे साहित्य जगातील अनेक साहित्यात अनुवादित केले गेले. दोन हजार वर्षानंतर ही प्रत्येक साहित्यिकाला कालिदासाचे लिखाण खुणावत असतं. विल्यम जोश यांनी कवि कुलगुरू कालिदास यांना भारताचा शेक्सपियर ही पदवी बहार केली. कालिदासाच्यां सात कलाकृती उपलब्ध आहेत. परंतु मेघदूत ही त्यांची एक मात्र कृती जरी उपलब्ध असतील तरी त्यांचे नाव श्रीखंडात अजरामर झाले असते. काय होते असे मेघदूतात?

मेघदुताचे दोन भाग आहेत. पूर्वमेघ यामध्ये कालिदासाचे सृष्टीवरील प्रेम व्यक्त होते. सर्व निसर्गाला भावनांचे अंकुर पसरलेले आहेत. तर उत्तरमेघात भावनांचा शुद्ध विलास असला. तरी त्यात भावनांचा तोलदारपणा आहे. यात यक्ष व कांता यांच्या प्रेम जीवनाचं हृदय गमन दर्शन घडवलं आहे. यात यक्ष व कांता यांच्या विरहाचा रस यात आहे. पण तरीही कुणाबद्दलही जळजळ, द्वेष, असुया नाही. एक संघपनाला डंख लागेल अशी एकही कल्पना किंवा वाक्य यात नाही.

पहिल्या ओळी पासून कवीने करूणमधुर आणि ललिततरल इंद्रधनुष्य उभारले आहे. तसेच प्रदेश उपाध्यक्ष शारदा पाटील यांनी निसर्ग व विठ्ठलावर आधारित स्वरचित कवितेचे रसग्रहण केले. यावेळी ललिता पाटील, प्रतिभा सुर्यवंशी, शितल कासार, शारदा पाटील, लिलाबाई पाटील, आरुषी बोरसे, हिराबाई पाटील, रत्ना सोनवणे, हितेश्वरी पाटील, अश्विनी पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या