Saturday, April 27, 2024
Homeधुळेकवी अरविंद भामरे यांच्या कवितेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश

कवी अरविंद भामरे यांच्या कवितेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश

बोराडी – Boradi – वार्ताहर :

महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत जगातील सर्वांत मोठा महाकाव्य ग्रंथात किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ. बी.आर.आंबेडकर अध्यापक विद्यालय येथील शिक्षक अरविंद भामरे यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

या संग्रहात एकूण 2021 कविता असून यात जगभराचे मराठीतले तीन पिढीच्या दर्जेदार कवींच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

या संग्रहाची बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरचा सर्वात मोठा काव्य संग्रह म्हणून गिनीज बुक वर्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. प्रा. अशोककुमार दवणे यांनी हा संग्रह संपादीत केला आहे.

कवी अरविंद भामरे यांचा आसवांचा विद्रोह हा कविता संग्रह यापुर्वी प्रकाशित झाला असून त्या संग्रहाला अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. एक दर्जेदार कवी म्हणून त्यांची खान्देशात ओळख आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशा रंधे, बोराडीचे उपसरपंच राहूल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, शशांक रंधे व डॉ.बी.आर.आंबेडकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सु. ल. वैद्य यांनी कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या