Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआजपासून पीएमपीएमएल बससेवा सुरु

आजपासून पीएमपीएमएल बससेवा सुरु

पुणे (प्रतिनिधी) | Pune –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली शहरातील बससेवा (पीएमपीएमएल)

- Advertisement -

आजपासून सुरु झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बसमध्ये एकावेळी १७ किंवा २० प्रवाशांना प्रवासाची परवानगी असणार आहे. असे असले तरी तिकीट दारात मात्र, कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील १९० मार्गांवर आता ४२१ बसेस धावणार आहेत. तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. योग्य ती खबरदारी घेऊन पीएमपीएमएल सुरू करण्यात आली आहे. स्वारगेट, पुणे मनपा, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन, हडपसरसारख्या गर्दीच्या मार्गांवर सकाळी आणि सायंकाळी शटल सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी १२० जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दोनशे बस आधीपासूनच मार्गावर धावत होत्या. उर्वरित दोनशे, अडीचशे बसचा ताफा सेवेसाठी तयार करण्यात आला आहे.

बसमध्ये एकावेळी १७ किंवा २० प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. महिला व पुरुष प्रवाशांचे यात नियोजन करण्यात आले आहे. ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ आणि १० वर्षांच्या आतील मुलांना बसमध्ये प्रवास करता येणार नाही. बसमध्ये मास्क लावूनच बसावे. तसेच कॉइन बॉक्स देखील ठेवण्यात आला आहे. सोशल डिस्टनसिंगसाठी सीटवर मार्किंग करण्यात आल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी दिली .

दरम्यान, सुट्टीवर असणाऱ्या सेवकांना आता काम मिळणार आहे. गेल्या ५ महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना काम नव्हते. त्यांना वेतन मिळत नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. जवळपास २०० कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजगार सुरू होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या