Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशPM SVANidhi : कर्जासाठी तब्बल 'इतके' अर्ज

PM SVANidhi : कर्जासाठी तब्बल ‘इतके’ अर्ज

दिल्ली | Delhi

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 15 लाखांपेक्षा जास्त जणांकडून कर्जासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 5.5 लाखांपेक्षा जास्त जणांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. जवळपास दोन लाख जणांना कर्जांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाच्यावतीने (Ministry of Housing and Urban Affairs) देण्यात आली आहे.

- Advertisement -

कर्जप्रकरणांच्या मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी पथ विक्रेत्यांनी त्यांना सोईच्या असलेल्या बँक शाखांमध्ये अर्ज करावेत, असे सांगण्यात आले आहे. या कर्जाच्या अर्जामध्ये प्राधान्य असलेल्या बँकेची, त्या शाखेची किंवा अर्जदाराचे बचत खाते, ज्या बँकेत आहे, त्याची माहिती जाणून घेण्यात येत आहे. त्यानुसार कर्ज प्रकरणांवर काम करण्यात येत असल्यामुळे ती मंजूर करण्यास आणि निधीचे वितरण करण्याचे काम अतिशय कमी वेळेत होत आहे.

कर्ज प्रकरणांच्या मंजुरी आणि निधी वितरणाचे काम अधिक सुलभ व्हावे, यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. दि. 11 सप्टेंबर,2020 पासून त्यामार्फत काम केले जात आहे. आत्तापर्यंत अंदाजे 3 लाख अर्जांचे काम बँकांनी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले आहे. त्याच्या मदतीने अर्जदाराने दिलेल्या प्राधान्यानुसार त्याचे कर्जप्रकरण त्या विशिष्ट बँक शाखांकडे दर आठवड्याला पाठवण्यात येत आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी वेगाने करून, पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना तातडीने वित्तीय मदत संबंधित संस्थाकडून मिळण्यासाठी उपाय योजण्यात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या