Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशयुपीच्या मोदीजींचा मोठा निर्णय! 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

युपीच्या मोदीजींचा मोठा निर्णय! ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) मोदीजींनी लखनौमधील सरोजिनी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते यंदा अपेक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे समजते…

- Advertisement -

उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी अभिनंदन पाठक (Abhinandan Pathak) हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसतात. ते स्वतःला मोदी भक्त असल्याचे सांगतात. यंदाच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांना निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीसाठी त्यांनी भाजपमध्ये तिकीटदेखील मागितले. परंतु त्यांना भाजपकडून याबाबत कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.

याबाबत ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे पत्राद्वारे तिकिटाची मी मागणी केली होती. मात्र त्यांनी माझ्या पत्राकडे लक्ष दिले नाही. भाजप माझ्याकडे दुर्लक्ष करू शकते, पण मी निवडणूक नक्कीच लढवणार आहे.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

दरम्यान पाठक यांना आपण निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा युपीचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे. पीएम मोदी आणि सीएम योगी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते जनतेसाठी निस्वार्थपणे काम करत आहेत, त्यांच्या कामाची प्रशंसा करतो, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

यापूर्वी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला मदत करण्यासाठी ते राज्यात फिरले होते. तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांनी त्यांना गांभिर्याने घेतले नाही आणि त्यांची खिल्ली उडवली होती, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Visual Story : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं वाढदिवशीच उरकला साखरपुडा; फोटोज व्हायरल

पाठक यांच्या म्हणण्यानुसार छत्तीसगड भाजपाने त्यांना यात्रेदरम्यान राहण्यासाठी जागा दिली नाही. त्यांची पत्नी मीरा पाठक यांनी आर्थिक पाठबळ नसल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज केला. पाठक यांना तीन मुलींसह एकूण ६ मुले आहेत.

नितेश राणेंना जोर का झटका; कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

घटस्फोटानंतर पाठक आपल्या उदरनिर्वाहासाठी ट्रेनमध्ये काकडी विकतात. जेव्हापासून त्यांनी आर्थिक संकटानंतर घर सोडले तेव्हापासून पाठक यांच्या पत्नीने त्यांच्याशी संपर्क साधला नाही. त्यांना राजकारणी बनून समाजाची सेवा करण्याची इच्छा असल्याचेदेखील पाठक यांनी स्पष्ट केले आहे.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

- Advertisment -

ताज्या बातम्या