Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदींनी राज्यसभेत विरोधकांवर हल्लाबोल करत नव्या कृषी कायद्यांवर सोडलं मौन, म्हणाले...

पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत विरोधकांवर हल्लाबोल करत नव्या कृषी कायद्यांवर सोडलं मौन, म्हणाले…

दिल्ली l Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

- Advertisement -

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरु सभागृहात भाष्य केलं. या भाषणात करोना संकटकाळातील भारताच्या कामगिरीसह नव्या कृषी कायद्यांबाबत आणि शेतकरी आंदोलनावर बोलत या विषयीचे आपलं मौन सोडलं आहे. तसेच त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज राज्यसभेत पंतप्रधान बोलत असताना म्हणाले, देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांचाही कृषी क्षेत्रातील सुधारणांना पाठिंबा आहे. त्यांच्यासोबतच कॉंग्रेस आणि अन्य विरोधक पक्षांनी एकेकाळी सुधारणा व्हाव्यात अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात अंमलबजावणी होऊ शकली नसेल पण आता होत आहे मग त्याला विरोध का? असा सवाल नरेंद्र मोदींनी विचाराला आहे. दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनातील वयोवद्धांना पाहून आम्हाला आनंद होत नाही अस पंतप्रधान म्हणाले आहेत. तर एकदा संधी देऊन पाहा, या सुधारणेमुळे फायदा होईल की नाही. त्यानंतरही आपण सुधारणा करु शकू असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. आंदोलनावर चर्चा होतच राहिल, पण आंदोलन मागे घ्यावे, असे मोदींनी म्हटलं आहे.

तर देशात आंदोलनजीवी ही नवी जमात उदयास आली आहे. त्यापासून देशातील जनतेने सावध राहायला हवं असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला आहे. वकिलांच्या आंदोलनात वकील नसतात, आंदोलनजीवी असतात विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात, असे मोदींनी म्हटले. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. असा टोला मोदींनी लगावला आहे.

तसेच, नव्या कृषी कायद्यांमुळे पिकांना हमी भाव मिळणार कि, नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात साशंकता असताना पंतप्रधान मोदींनी हमी भाव कायम राहील, असे आश्वासन संसदेत दिले. तसेच, ‘एमएसपी होता, एमएसपी आहे आणि भविष्यातही एमएसपी कायम राहिलं. गरीबांना परवडणाऱ्या दरात धान्य उपलब्ध करुन दिले जाईल. मंडींचे आधुनिकीकरण केले जाईल’ असे मोदींनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या भाषणाचा उल्लेख करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर मैथिली शरण गुप्त यांची कविता ऐकून देशापुढे असलेल्या संधीकडे लक्ष वेधलं. आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहोत. त्यामुळे देशासाठी काही तरी केलं पाहिजे ही भावना प्रत्येकामध्ये असायला हवी. संकटाच्या काळात जगाची नजर आपल्याकडेच असते. ‘अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल’ मैथिली शरण गुप्त यांची ही कविता संसतदेत ऐकवली. त्यानंतर ते म्हणाले मैथिली शरण गुप्त आज असते तर त्यांनी हीच कविता वेगळ्या पद्धतीने लिहिली असती. त्यांनी ही कविता कशी लिहिली असती हे आपल्या शब्दात त्यांनी मांडलं. मैथिली शरण गुप्त म्हणाले असते, ‘अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड’, अशी कविता मोदींनी सभागृहात म्हणताच सदस्यांनी डेस्क वाजवून त्यांचं स्वागत केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या