Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशPM Modi Birthday: वाढदिवसानिमित्त राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवालांनी मोदींना दिल्या...

PM Modi Birthday: वाढदिवसानिमित्त राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवालांनी मोदींना दिल्या अशा शुभेच्छा

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi)यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देश आणि जगभरातील सर्वच नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, भाजप नेत्यांबरोबरच विरोधी पक्षांचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटले आहे की, ‘पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा.’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायष्यासाठी प्रार्थना,’ असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या