Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानमध्ये पंतप्रधान मोदी, वैमानिक अभिनंदन यांचे पोस्टर्स

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान मोदी, वैमानिक अभिनंदन यांचे पोस्टर्स

लाहोर –

भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेच्या वेळी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची झालेली अवस्था पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)

- Advertisement -

पक्षाचे खासदार अयाज सादिक यांनी पाकिस्तानी संसदेत जगजाहीर केल्याने मोठी खळबळ उडाली असतानाच अचानक लाहोरच्या रस्त्यांवर अभिनंदन वर्धमान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स दिसून आल्याने त्यात आणखी भर पडली आहे.

विशेष म्हणजे या पोस्टर्समधून अयाज सादिक यांच्यावर टीका करण्यात आली आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारताकडून पाकिस्तानवर हवाई हल्ले निश्चित होते, असा गौप्यस्फोटही खा. अयाझ सादिक यांनी केला होता. यावरून पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर सादिक यांच्या मतदारसंघात अभिनंदन आणि पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले. यात सादिक यांना देशद्रोही ठरवत अभिनंदनच्या रूपातही दर्शवले आहे. काही पोस्टर्समध्ये भारताचे समर्थक असाही उल्लेख आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या