Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेश९ कोटी शेतकऱ्यांना आज मिळतील १८ हजार कोटी

९ कोटी शेतकऱ्यांना आज मिळतील १८ हजार कोटी

नवी दिल्ली :

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे. ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार कोटी रुपये ट्रान्सफर होणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा हफ्ता ट्रान्सफर केला जाईल.

- Advertisement -

महिन्याच्या २५ तारखेला म्हणजेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत आर्थिक लाभाचा पुढील हफ्ता मिळणार आहे.

२ हजारांचा हफ्ता

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये देते. आतापर्यंत शेतकऱ्यांना ६ हफ्ते दिले गेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा पहीला हफ्ता डिसेंबर २०१८ मध्ये दिला गेला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या