Friday, April 26, 2024
Homeनगरपंतप्रधान आवास योजनेसाठी 232 कोटी 89 लाखांचा निधी

पंतप्रधान आवास योजनेसाठी 232 कोटी 89 लाखांचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अनुसूचीत जमाती घटकांअंतर्गत सन 2019-20 या वित्तीय वर्षासाठीचा केंद्र शासनाकडून राज्य शासनास

- Advertisement -

प्राप्त पहिला हप्ता म्हणून 40 कोटी 26 लाख 33 हजार तसेच समरूप राज्य हिस्सा म्हणून 192 कोटी 63 लाख 36 हजार असे मिळून 232 कोटी 89 लाख 69 हजार एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेकांचे रखडलेले अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गरिबांसाठी घरे मिळावीत यासाठी सरकारने ही योजना आणली. सुरवातीला लाभार्थ्यांना निधीही आला. पण पुढे करोनाचे संकट उभे राहिले. त्यात आर्थिक संकट कोसळले. हाताची कामे गेल्याने काहींवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेला पैसा खर्च करून घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली असून आज ना उद्या हप्ते मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती.पण हप्ते मिळाले नाही. त्यामुळे बांधकामाची चिंता वाढली होती. आता हा निधी वितरणास शासनाने मान्यता दिल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिंळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या