Thursday, April 25, 2024
Homeनगरसात दिवसात थकबाकी न भरल्यास प्लॉटधारकांवर कारवाईचा इशारा

सात दिवसात थकबाकी न भरल्यास प्लॉटधारकांवर कारवाईचा इशारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर हद्दीतील थकीत मालमत्ताधारकांनी सात दिवसात थकीत महसूल कराची रक्कम न भरल्यास संबंधित प्लॉटधारकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,

- Advertisement -

याची नोंद घ्यावी, असा इशारा श्रीरामपूरचे कामगार तलाठी राजेश घोरपडे यांनी दिला आहे.

थकीत मालमत्ता कराची रक्कम भरणेबाबत वेळोवेळी सूचित करूनही अद्याप बर्‍याच प्लॉटधारकांनी थकबाकी भरलेली नाही. श्रीरामपूर या महसुली हद्दीतील सरस्वती कॉलनी, मोरगे वस्ती, बोरावके नगर, बोंबले नगर, नॉर्दन ब्रँच, संजयनगर, रामनगर, गोपीनाथ नगर, वार्ड नं. 2 व वार्ड न. 7, थत्ते ग्राउंड, चौधरी वस्ती, फकीरवाडा, दशमेशनगर, शेडगे मळा, साईनगर, लोढामळा, सुतावणे वस्ती, गुलशन नगर, काझीबाबा रोड,

नेवासा रोड, शिवाजी रोड, मेनरोड, संगमनेर रोड परिसर, सूतगिरणी परिसर, पोस्ट कॉलनी, भैरवनाथ नगर ही सर्व ठिकाणे आणि त्यांच्या परिसरातील या सर्व संबंधीत शेती, बिगरशेती प्लॉटधारकांनी त्याचेकडील श्रीरामपूर तलाठी कार्यालयाची थकबाकी सात दिवसात जमा करावी. अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 178 ते 184 कलमान्वये पुढील कारवाई करण्यात येईल, असेही श्री. घोरपडे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या