Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमराठा समाजाच्या तीव्र भावना पोहचविण्याचे माध्यम अधिवेशनाचे व्यासपीठ: छ. संभाजी महाराज

मराठा समाजाच्या तीव्र भावना पोहचविण्याचे माध्यम अधिवेशनाचे व्यासपीठ: छ. संभाजी महाराज

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

आजपर्यंत मराठा समाज हा प्रत्येकवेळी मोठ्या भावाची भुमिका घेत आला आणि पुढेही घेईल. सर्व जाती-धर्माच्या अठरा पगड समाजाला सोबत घेऊन चालण्याचे कर्तव्य हे आजपर्यंत केले, पुढे पण अविरत करत राहू.

- Advertisement -

आता मराठा समाज हा प्रवाहाच्या बाहेर जात असुन आता समाजाची आर्थिक स्थिती बिकट होत चाललेली असल्याने मला समाजाचे न्यायिक प्रश्न मांडण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे.

दिवाळीच्या आधी सर्व नुकसान ग्रस्त शेतक-्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी तसेच मराठा समाजाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे अन्यथा आम्ही हिसका दाखवू असा इशाराही छत्रपती संभाजी महाराज यांंनी यावेळी दिला.

छावा क्रांतीवीर सेनेचे सहावे राष्ट्रीय महाअधिवेशन नांदेड येथील सोनखेड या ठिकाणी मोठ्या उत्साहमये नुकतेच पार पडले.

यावेळी या अधिवेशनप्रसंगी मार्गदर्शन करताना युवराज छत्रपती संभाजीराजे म्हणााले की. ही संघटना समाजातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारी चळवळ आहे.

छावा क्रांतिवीर सेनेच्या विधायक कामांसाठी माझा नेहमीच पाठिंबा असेल असे देखील राजे म्हणाले. यावेळी व्यासपीठावरुन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेन्द्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी संघटनेची भूमिका मांडताना राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समाचार धेताना राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर कडाडून टीका केली, ना. अशोक चव्हाण हे मराठा समाजाचा विश्वासधात करत आहे अशा विश्वासघाती त्यात मराठा आरक्षण उपसमिती वरून तात्काळ हटवावे, त्या जागी योग्य व्यक्तीची निवड करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन विक्रम कदम यांनी तर प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लखन मोरे व आभार प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी मानले.यावेळी अधिवेशनात असंख्य समाज बांधव होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या