नवीन नाशिक परिसरात आढळली प्लास्टिक सदृश्य अंडी

jalgaon-digital
1 Min Read

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशकातील उत्तम नगर परिसरातील शिवपुरी चौक येथील एका रहिवाशाला प्लास्टिक सदृश्य अंडी आढळून आली याप्रकरणी सदर रहिवासी अन्न औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले….

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तम नगर येथील शिवपुरी चौकातील रहिवासी सचिन परदेशी यांनी काल ( दि. १५ ) रोजी रात्रीच्या वेळी परिसरातील एका किराणा दुकानातून अंडी आणली यानंतर ही अंडी ऊकळावयास ठेवली असता दोन तासानंतरही पूर्णतः उकळली गेली नाहीत.

दरम्यान, त्यानंतर त्यांनी अंडी खाल्ली यानंतर काही वेळात त्यांना पोटात त्रास जाणवू लागला यानंतर सदर अंडीच्या आत मध्ये असलेला बघितले असता त्यात त्यांना प्लास्टिक सदृश्य पदार्थ आढळून आला.

सदर भाग जाळून बघितले असता त्यातून दुर्गंधीयुक्त वास येत होता. याप्रकरणी परदेशी हे अन्न औषध प्रशासनकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना शारीरिक क्षमता वाढवण्याकरता अंडी खाण्याचा सल्ला दिला आहे, आणि अशातच प्लास्टिक सदृश्य अंडी जर कोणी खाल्ली तर त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *