Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्लास्टिक बॉटल 'डस्टबिन'

औरंगाबाद महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्लास्टिक बॉटल ‘डस्टबिन’

औरंगाबाद – Aurangabad

मनपा कार्यालयात (Municipal offices) येणाऱ्या नागरिकांनी रिकाम्या प्लास्टिक बाटल्या (Plastic bottles) इतरत्र न फेकता त्या प्लास्टिक बॉटल डस्टबीनमध्ये टाकाव्यात, सदरील प्रतीकात्मक डस्टबिन बॉटल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आली आहे. अशा प्रकारच्या दहा डस्टबीन सिद्धार्थ गार्डन, कॅनॉट गार्डन आदीसह शहरात गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

नागरिकांनी अशा प्रकारच्या डस्टबिन चा वापर करून शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे. सहायक आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे आणि त्यांची टीम औरंगाबाद ला भारतात दहा स्वच्छ शहरांमध्ये आण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावा यासाठी महानगरपालिका प्रशासक पाण्डेय यांनी आपल्या अभिनव नाविन्यपूर्ण , संकल्पनेतून प्रतीकात्मक प्लास्टिक बॉटल डस्टबीन तयार करण्यात आली आहे.

प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यावर किंवा इतरत्र न टाकता या डस्टबिन मध्ये टाकून तसेच ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटा गाडीला द्यावा व घरच्या घरी खत निर्मिती करून शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याचे आवाहन प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नागरिकांना केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या