Friday, April 26, 2024
Homeजळगावप्लाझ्मा युनिटला ग्रीन सिग्नल

प्लाझ्मा युनिटला ग्रीन सिग्नल

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोनाच्या महामारीत प्लाझ्मामुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे. प्लाझ्मासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत होते.

- Advertisement -

शासकीय वैद्यकीय महाविद्यायात प्लाझ्मा युनिटच्या परवानगीसाठी दिल्ली येथे परवानगी मागण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रस्ताव रखडला होता खा. उन्मेष पाटील यांनी पाठपुरवा करुन एका दिवसात ड्रग कंट्रोलर सेंट्रल ऑफ इंडियाने परवागनी दिली आहे. याबाबतचे पत्र अधिष्ठातांना प्राप्त झाले असून त्यांनी तात्काळ अधिकार्‍यांना प्लाझ्मा युनिट तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा युनिटसाठी केंद्र शासनाकडे परवागनी मागण्यात आली होती. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रस्ताव धूळखात पडला होता.

प्लाझ्मा युनिटसाठी लागणारी वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेतील आवारातील तेरा लाखाची दोन युनिट व प्लाझ्मा साठवणूक करण्यासाठी 4 फ्रिज,जनरेटर अशी कोट्यावधी रुपयाचे युनिट राज्य आणि केंद्राच्या परवानगी अभावी बंद होता.

याबाबत खा. उन्मेश पाटील यांनी दिल्ली येथील ड्रग कंट्रोलर सेंटर ऑफ इंडियाच्या कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने ही परवानगी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. अवघ्या एका दिवसात ड्रग कंट्रोलर सेंट्रल ऑफ इंडियाने परवागनी दिली आहे.

धूळखात पडली होती मशिनरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यायात प्लाझ्मा युनिटसाठी लागणारी यंत्रसामुग्री गेल्या अनेक महिन्यांपासून महाविद्यायाच्या आवारात धूळखात पडली होती. परंतु या युनिटला परवागीच मिळत नसल्याने यंत्रणा देखील हतभल झाली होती. मात्र आज युनिटला केंद्र शासनाकडून लागणारी परवागी मिळाली असून याबाबतचे पत्र देखील महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना प्राप्त झाले आहे.

मंजूरी मिळताच तात्काळ बैठक

प्लाझ्मा युनिटला मंजूरी मिळताच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तात्काळ संबंधित विभागांचे प्रमुखांची यांची बैठक घेतली. या बैठकीला ट्रान्समिशन कमिटीचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवेरे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आकाश चौधरी, डॉ. विजय गायकवाड, डॉ. शैला पुराणिक उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी युनिटसाठी अजून कुठल्या बाबींची आवश्यकता आहे याबाबत तात्काळ प्रास्ताव सादर करुन मंजूर कराव्यात. तसेच लवकरात लवकर हे युनिट कार्यन्वयीत करण्याच्या सुचना देखील डॉ. रामानंद यांनी अधिकार्‍यांना दिल्या. त्यामुळे लवकरच शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्लाझ्मा युनिट कार्यान्वयीत होणार आहे.

भटकंती थांबणार

प्लाझ्मा युनिटला परवागी मिळाल्यानंतर प्लाझ्मा डोनर करणारे आणि गरजू रुग्ण अशा दोन्ही घटकांची 24 तास सोय होणार आहे. त्यामुळे प्लाझ्मा अभावी मृत्यू होणार्‍या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी हे युनिट जीवनदायी ठरणार आहे. तसेच प्लाझ्मासाठी नागरिकांची होणारी भटकंती देखील आता थांबणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या