नाशिकमध्ये प्लाझ्मा संकलनास प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाबाधितांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रशासकी पातळीवरील परवानगी घेण्याची प्रकिया सुरू असून अर्पण रक्तपेढीने प्लाझ्मा संकलनास सुरुवात केली आहे. नाशिकमधील करोनाबाधितांवर या थेरपीद्वारे उपचार सुरू झाले आहे, अशी माहिती अर्पण रक्तपेढीचे चेअरमन डॉ. एन. के. तातेड यांनी दिली.

जगातील सर्व देश करोना विषाणूवर लस तयार करणत व्यस्त आहे. पण लस तयार होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. मात्र प्लाझ्मा थेरेपीमुळे करोनाचा रुग्ण बरा होतो, असे निदर्शनात आले आहे. प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धतीत करोनातून पूर्णपणे बरा झालेल व्यक्तिच रक्तातील प्लाझ्मा हा घटक संकलीत करून त्याचा वापर करून बाधित रुग्णांवर उपचार केले असता कोरोना बाधित रुग्ण बरा होऊ शकतो.

पॉझिटिव्ह रुग्णांवर हा उपचार अधिक प्रभावी ठरणार असून नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्लाझ्मा संकलन करण्यासाठी लागणारी सर्व साधनसामग्री अर्पण रक्तपेढीत उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टर्स व तंत्रज्ञाची टिम अर्पण रक्तेढीत आहेत. करोना मुक्त झालेले रुग्ण अर्पण रक्तपेढी शी थेट संपर्क साधत आहे.

प्लाझ्मा दान करणार्यांची माहिती मिळताच निफाड तालुक्यातील सायखेडा गावातील धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन गिते यांनी अर्पण रक्तपेढीत प्लाझ्मा दान करून जनतेसमोर आदर्श ठेवला आहे. करोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्न करावेत, असे आवाहन अर्पण रक्तपेढीचे व्हा. चेअरमन डॉ. अतुल जैन यांनी केले आहे.

रक्तदानासाठी आवाहन

करोनाच प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताअभावी रुग्णांच शस्त्रक्रिया पुढे ढकलणत आल्या आहेत. तसेच थॅलेसेमिया रुग्णांना दर १५-२१ दिवसांनी रक्त द्यावे लागते. रुग्णांना रक्त वेळेवर मिळाले नाही तर त्यांच्या जीवास धोका असतो. तरी नाशिककरांनी रक्तदान शिबिरे आोजित करावे व रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन अर्पण रक्तपेढीच र्कायकारी संचालिका डॉ. वर्षा उगांवकर यांनी केले आहे.

प्लाझ्मा दान कोण करू शकतो : –

दात्याचे व १८ पेक्षा जास्त असावे.

वजन ५५ किलो पेक्षा जास्त असावे.

कोरोना आजारातून बरे होऊन २८ दिवस पूर्ण झाले असावे.

प्लेटलेट कांऊट १.५ लाख असावा.

हिमोग्लोबीन १२.५ ग्रॅम असावे.

रक्तदानासाठी आवश्क असलेल्या इतर सर्व अटी.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *