Monday, April 29, 2024
Homeनाशिकझाडे लावा अन् अतिरिक्त गुण मिळवा!

झाडे लावा अन् अतिरिक्त गुण मिळवा!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे Yashwantrao Chavan Maharashtra Open University या शैक्षणिक वर्षापासून ‘एक विद्यार्थी एक झाड’ हा नाविन्यपूर्ण पर्यावरणपुरक उपक्रम One Student One Tree ‘initiative राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

या उपक्रमाअंतर्गत सहभागी होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला लागवडीपासून सहा महिने कालावधीसाठी एका वृक्षाची जबाबदारी घ्यावी लागणार असून, वर्षाच्या शेवटी त्याला या उपक्रमासाठी अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत.

या उपक्रमास वायओएसओटी ((YCMOU One Student One Tree) असे नाव देण्यात आले असून संकेतस्थळावर याच नावाने संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठात दरवर्षी साडे पाच लाखाहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट होत असून, या उपक्रमांतर्गत दरवर्षी महाराष्ट्रभरात पाच ते साडेपाच लाख झाडे लावली जाण्याची शक्यता आहे.

किमान एक वर्ष कालावधी असणार्‍या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होवू शकतील. या उपक्रमात सहभागी होणारे विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यापीठाने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या यादीपैकी प्रत्येकी एका वृक्षाची लागवड करतील. विद्यापीठाने या प्रकल्पासाठी विशेष मोबाईल एप्लिकेशन तयार केले आहे. या उपक्रमात सहभागी होवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी हे अ‍ॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करणे अनिवार्य आहे.

सलग सहा महिने जोपासना करणार्‍या विद्यार्थ्यास त्याच्या अंतिम परीक्षेच्या गुणांमध्ये एक वर्ष कालावधीच्या शिक्षणक्रमाला दहा गुण तर पदवी परीक्षेच्या तीन वर्षांसाठी एकूण 25 प्रोत्साहन गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थी अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या धउचजण.रल.ळप या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. या उपक्रमाची मूळ संकल्पना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या