Friday, April 26, 2024
Homeनगरऑक्सिजनच्या नियोजनासाठी समन्वय अधिकारी नियुक्त

ऑक्सिजनच्या नियोजनासाठी समन्वय अधिकारी नियुक्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात वाढत्या करोना संसर्गामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

- Advertisement -

वाढलेली मागणी होणारा पुरवठा यात सन्मवय न राहिल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आता जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन उत्पादन आणि रिफिल यासाठी समन्वय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी काढले आहेत.

यात पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल यांच्याकडे नगर महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात या हॉस्पिटलकडून ऑक्सिजनच्या रिफीलची माहिती समन्वय अधिकारी यांच्याकडून घेणे, संबंधित रुग्णालयात दाखल रुग्ण संख्येच्या प्रमाणात संबंधीत रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणे, मागणी आणि पुरवठ्यानूसार ऑक्सिजनचे नियोजन करणे आदी कामे सोपविण्यात आली आहेत.

यासह भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे ग्रामीणमधील सर्व शासकीय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना पुर्नवसचे तहसीलदार रोहिदास वारुळे, आर.बी. बकरे, जे. बी. सुतार आणि राम नलावडे हे महसूल कर्मचारी सहाय करणार आहेत.

रिफिलर समन्वय अधिकारी म्हणून समाज कल्याण विभागाचे साहयक आयुक्त देवढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कोकाटे, जिल्हा सांख्यायिक अधिकारी सुधीर आडसूळ, संगमनेर बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ पाटील आणि श्रीगोंदा येथील अप्पर तहसीलदार चारूशिला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या