Thursday, April 25, 2024
Homeजळगाव100 कोटींच्या कामांचे नियोजन हा मुर्खपणाचा कळस !

100 कोटींच्या कामांचे नियोजन हा मुर्खपणाचा कळस !

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी राज्यशासनाने 100 कोटीचा (100 crore works) निधी मंजूर केला आहे. परंतू या निधीतून होणारे अनेक रस्त्यांचे कामे काही झाले आहे तर कुठे सुरू आहे. तसेच डांबरीकरण झालेले रस्ते हे क्रॉक्रिटीकरणसाठी पून्हा या रस्त्यांचे कामे 100 कोटींच्या कामांमध्ये घेतले आहे, यात महापालिकेला कुठेही विश्वासात घेण्यात आले नाही, शासनाकडून परस्पर निर्णय घेण्यात आला. निधीची नियोजन (Planning) अत्यंत चुकीच्या पध्दतीने करण्यात आले हे नियोजन जगात कुठे ही दिसणार नाही असा मुर्खपणाचा (stupidity) कळस हा केलेला आहे. हे नियोजन करतांना शहराचे नेत्यांनी जबाबादारी ने यात लक्ष घालणे आवश्यक होते असे थेट आरोप शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा सभेच्या प्रारंभी लक्षवेधीतून केले. याला जोरदार प्रतिउत्तर भाजपच्या सदस्यांनी दिल्याने यावेळी भाजपा व ठाकरे गटाच्या सदस्यांमध्ये पाहण्यास मिळाली.

- Advertisement -

महापालिकेची महासभा शुक्रवार 21 रोजी मनपा इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकरा वाजता महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, प्रभारी नगरसचिव अविनाश बाविस्कर उपस्थित होते.सभेत 48 विषय एकमताने मंजूर करण्यात आले, तर एक विषय तहकूब करण्यात आला. यावेळी नितीन लढ्ढा यांनी शंभर कोटीतून रस्ते जर चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करून रस्ते केले तर क्राँक्रिटीकरण रस्त्यांपेक्षा अधिक लांबीचे डांबरीकरण केले तिनपटने रस्ते तयार होतील अशी माहिती दिली. तर सभेच्या सुरवातीला मनोज चौधरी यांनी महापौरांना पत्र देत मी शिवसेना पक्षावर निवडणून आलो आहे, मला शिवसेनेचे गटनेते करावे अशी मागणी केली.

शासनाचा निधी पाण्यात जाणार

शहरात अद्यापही अमृत योजना, भुयारी गटार योजना यांची कामे बाकि आहेत, त्यासाठी आणखी रस्ते खोदावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत शहरात शासनाच्या शंभर कोटी निधीतून रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हे नियोजन अत्यंत चुकीच्या पध्दतीचे आणि अव्यवहार्य आहे. शासनाच्या निधीचा हा पूर्ण पाण्यात जाणार आहे. याबाबत आपण भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार आहोत. आयुक्तांनीही याबाबत लक्ष देवून रस्ते क्रॉकीटीकरण न करता डांबरीकरण करण्यावर लक्ष द्यावे त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र द्यावे अशी मागणीही लढ्ढा यांनी केली.

क्राँक्रिटीकरण न करता डांबरीकरण

सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात या निधीवरून वाद झाला त्यानंतर दोन्ही गटाच्या सदस्यांनी समन्वयाने निर्णय घेण्यावर भर दिला. रस्त्याचे काँक्रिटीकरण न करता डांबरीकरण करण्याबाबत महापालिकेतील सर्व गटनेते तसेच आमदार सुरेश भोळे यांची बैठक घेवून निर्णय घ्यावा. तो प्रशासनाला कळवावा त्यावर प्रशासनाने पत्र तयार करून राज्य शासनाला पाठवावे त्यानंतर त्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला.

भाजपकडून लढ्ढांच्या आरोपाचे खंडन

भारतीय जनता पक्षाकडून नितीन लढ्ढा याच्या आरोपांचे जोरदार खंडण केले. डॉ.अश्वीन सोनवणे जो निधी आला आहे त्यातून रस्ते क्रॉकींटीकरण करण्याचे नियोजन व्यवस्थित करण्यात आले आहे, नागपुर, अंबरनाथ शहराच्या विकासाच्या धर्तीवर जळगावचे हे रस्ते तयार करण्यात येणार आहे. त्याला आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही. आरोप करायचे म्हणून काही ही आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच भाजप गटनेते घुगे-पाटील म्हणाले, शासनाने न मागता निधी दिला आहे, याचे स्वागत केले पाहिजे. आमदार भोळे, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे योगदान आहे. आक्षेप न घेता समन्वयाने मार्ग काढण्यात यावा अशी मागणी केली.

तर.. मनपा सा.बां. विभागात विलीन करा

सभेच्य प्रारंभी सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी लक्ष्यवेधी उपस्थित केली.शहरातील रस्त्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या शंभर कोटी रूपयाच्या निधीतून कामाचे चुकीचे नियोजन केले असल्याचा आरोप त्यानी केला. मनपा ही शहराची प्राधीकरण संस्था असून महापालिकेला नियोजन करतांना कळविलेच नाही. असा प्रकार होत असेल तर मनपाला सार्वजनीक बांधकाम विभागात विलीन करून टाका असा उपरोधिक सल्ला लढ्ढा यांनी दिला.

डॉ.अश्विन सोनवणे अन् आयुक्तांमध्ये शाब्दीक वाद

शहरातील अमृत योजना तसेच पाणी पुरवठ्याच्या कामांवरून आयुक्त सद्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत असतांना मनपा कर्मचार्‍यांना कायम दोषी ठरवू नये. अऩेक कर्मचारी चांगल्या प्रकारचे काम करत आहे. एक दिवस जरी त्यांच्याकडून काम बंद झाल्यास त्यांच्या कामाचे महत्व समजेल असे आयुक्त डॉ. गायकवाड म्हणाले. यावर डॉ. अश्विन सोनवणे यांनी काम बंदची तुम्ही धमकी देत आहात का? असा प्रश्न उपस्थित करून शाब्दीक चकमक झाली.

अमृत नळ कनेक्शनवरवरून सदस्यांचा संताप

शहरातील अमृतचे पाण्यापासून जळगावकर अजून वंचित आहे. त्यांना केव्हा पाणी मिळणार, वाढीव वस्त्यांमधे अजून ही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे असे डॉ. अश्विन सोनवणे आक्रमक भूमीका मांडली. तसेच जितेंद्र मराठे, बंटी जोशी यांच्या अन्य सदस्यांनी यांनी पाणी गळती, नळ कनेकश्नबाबत समस्यांचा पाढा वाचला. तर घुगे-पाटील यांनी रामेश्वर कॉलनीतील पाणी टाकी केव्हा सुरू करणार असा प्रश्न उपस्थित केला. पंधरा दिवसात तेथील नागरिकांना पाणी न मिळाल्यास हंडा मोर्चा मनपावर आणणार असा इशारा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या