Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनप्लॅनेट मराठीचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

प्लॅनेट मराठीचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

पुणे – Pune

‘म मनाचा, म मराठीचा’ ही टॅगलाईन दर्शवते की मराठी कलेला प्राधान्य मिळावे व मराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतिल मनोरंजन एका क्लिकवर उपलब्ध व्हावे हेच प्लॅनेट मराठी ओटीटीचे ध्येय. चित्रपट, नाटकं, सत्य घटनांवर आधारित व काल्पनिक कलाकृती, वेब सिरीज, डोक्युमेंटरी, या साऱ्यांची सांगड घालणारा हा एकमेव मराठी ओटीटी असणार आहे.

- Advertisement -

निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक घेऊन येत आहेत मराठी भाषेचा अभिमान जपणारा, भारताचा पहिला-वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म.

ओटीटी या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्या पूर्णरूपी बदलली आहे. भारतात विविध निर्मितीगृहांनी व व्यावसायिकांनी ओटीटीचा क्षेत्रात झेप घेतली आहे. परंतु मराठी भाषेला जो दर्जा मिळायला हवा तो या ओटीटी वर मिळताना दिसत नाही. प्लॅनेट मराठी ओटीटी हे भारतातले पहिले असे माध्यम असेल जे मराठी भाषेतील मनोरंजनास प्राधान्य देईल.

मनोरंजनच नव्हे तर पाककला, व्यायाम, लहान मुलांचे माहितीपर कार्यक्रम हे सारेच या ओटीटीवर उपलब्ध असेल. अँड्रॉइड व आयओएस धारकांसाठी मनोरंजनाची नवी परिभाषा आखणाऱ्या या ओटीटी ने प्रत्येक मराठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काहीतरी खास प्रयोजन केलेले आहे तेही अगदी माफक अश्या दरात. आता खऱ्या अर्थाने मराठी भाषेतील मनोरंजनाला मानाचे स्थान मिळणार आहे असे म्हणायला हरकत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या