Saturday, April 27, 2024
Homeनगरदहा लाखाची बॅग पळवणारा दुसरा संशयित जेरबंद

दहा लाखाची बॅग पळवणारा दुसरा संशयित जेरबंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

शेतकर्‍यांना देण्यासाठी आडतदाराने बँकेतून काढलेली दहा लाखांची रक्कम आडतदाराकडीलच दोन नोकरांनी हिसकापून पळ काढला होता.  यातील दुसर्‍या संशयितास  कर्जत पोलिसांनी शिताफिने अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

- Advertisement -

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

सोमनाथ विठ्ठल साळुंखे (27, रा. कोरेगाव ता.कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.  ही घटना बरोबर वर्षभरापुर्वी 4 आक्टोबर 2021 रोजी  घडली होती. या प्रकरणी पियुष रविंद्र कोठारी (रा.कर्जत) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सदर दिवशी शेतकर्‍यांकडुन खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी कर्जत येथील अर्बन बँकेतून त्यांनी दहा लाखांची रोकड बॅगमध्ये ठेऊन मोटार सायकलवर मार्केटकडे येत होते. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांच्याच दुकानात हमालीचे काम करणारे कामगार सोमनाथ साळुंखे व प्रमोद आतार यांनी कोठारी यांच्या मोटार सायकलवर असलेली बॅग हिसकाऊन पळवून नेली होती.

मनपा कर्मचार्‍यांना 10 हजाराचे सानुग्रह अनुदान

यातील आतार यास पोलीसांनी काही तासातच अटक केली होती. मात्र साळुखे फरार होता.तो कर्जत तालुक्यात रात्री उशिरा दाखल झाला असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून कर्जत पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे 25 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.  न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, अनंत सालगुडे, पोलीस जवान शाहूराज तिकटे, उद्धव दिंडे, सलीम शेख, प्रवीण अंधारे यांनी बजावली.

ओरिसातून नगरला गांजाची वाहतूक

- Advertisment -

ताज्या बातम्या