Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगर20 पाईप व अ‍ॅपेरिक्षासह आरोपी अटकेत

20 पाईप व अ‍ॅपेरिक्षासह आरोपी अटकेत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लोखंडी पाईप चोरी करणार्‍या दोन आरोपींना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. शिवाजी दत्तात्रय घोडके (वय 35, रा. वार्ड नं. 7) व शाहरुख आयुब पठाण (वय 23, रा. वार्ड नं. 1, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून विनानंबरची अ‍ॅपेरिक्षा, 20 लोखंडी पाईप असा सुमारे 1 लाख 10 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी आयुब रज्जाक शेख (वय 46, रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) यांच्या दिघी येथील शेतातून अज्ञात चोरट्याने लोखंडी पाईप चोरी केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुरनं. 893/2023 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यादृष्टीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथकास या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने घटनास्थळी जावून तांत्रिक विश्लेषणकरुन करुन तसेच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती घेतली. त्यावरुन हा गुन्हा शिवाजी दत्तात्रय घोडके व शाहरुख आयुब पठाण यांनी केल्याची माहिती मिळाली. तसेच दोन्ही आरोपी श्रीरामपुरातील वार्ड नं. 2 येथे चोरी केलेले लोखंडी पाईप विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींकडून अ‍ॅपे रिक्षा, 20 लोखंडी पाईप व 15 किलो पत्र्याचे हुक असा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोना साईनाथ राशिनकर, रघुवीर कारखेले, पो.कॉ. राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, रमिझराजा अत्तार, मच्छिंद्र कातखडे, संभाजी खरात, कुलदिप पर्बत, कैलास झिने यांनी केली. घटनेचा तपास पोलीस नाईक रघुवीर कारखेले करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या