Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपिंप्री सैय्यद : सामाजिक वनीकरणाचा गावासाठी उपयोग; पाहा व्हिडिओ

पिंप्री सैय्यद : सामाजिक वनीकरणाचा गावासाठी उपयोग; पाहा व्हिडिओ

नाशिक | Nashik

तालुक्यातील पिंप्री सैय्यद गावाने (Syed Pimpri village) ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) माध्यमातून ८० एकर क्षेत्रावर सामाजिक वनीकरण क्षेत्र साकारल्याने गावातील ग्रामस्थांना कडक उन्हापासून सावलीचा आधार घेण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे…

- Advertisement -

पिंप्री सैय्यद गावाने २००० साली ८० एकरवर सामाजिक वनीकरण क्षेत्र साकारले आहे. सुरुवातील ही जागा पाच वर्ष वनविभागाकडे (Forest Department) होती. त्यानंतर संगोपन झाल्यावर ही जागा ग्रामपंचायतीला मिळाली. त्यावेळी ग्रामपंचायतीने सुरूचे आणि निलगिरीची झाडे लावली होती. यानंतर २००९ साली ही झाडे (Trees) ग्रामपंचायतीने तोडली.

या तोडलेल्या झाडांपासून २१ लाख ६५ हजार रुपये मिळाले. यानंतर गावाने ते पैसे ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी खर्च केले. त्यावेळी ग्रामपंचायतीला विकास निधीतून ७ लाख रुपये मंजूर झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीने पाईपलाईन करून काही ठिकाणी आंबा व १० हेक्टरवर चिंचेची झाडे लावली असून पिंप्री सैय्यद गावात सामाजिक वनीकरणाचे (Social Forestry Sector) वैभव उभे राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या