Thursday, April 25, 2024
Homeनगरपिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रथम पुरस्कार

पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रथम पुरस्कार

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal

माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय गट स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनिताई विखे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

- Advertisement -

तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावाने माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा, रस्ते, ग्रामस्वच्छता, करोना काळात आरोग्य व्यवस्था, ग्रामीण आवास योजना, वैयक्तीक लाभाच्या योजना अशा विविध क्षेत्रात भरीव काम केले आहे. ग्रामपंचायतीला नुकताच संत गाडगेबाबा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय गट स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये 50 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्रकाचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनिताई विखे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ. वनिता घोरपडे, गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ, सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास निर्मळ, ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय निर्मळ, विष्णू घोरपडे, सोपान निर्मळ, सौ. निर्मळ, जनसेवा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष जालिंदर निर्मळ, सचिव भाऊसाहेब घोरपडे, महिला आघाडीच्या सौ. मिनाताई निर्मळ, कैलास घोरपडे, रवींद्र घोरपडे, भीमराज निर्मळ, सचिन घोरपडे, ग्रामविकास अधिकारी रमेश सोमवंशी, गणेश जाधव, विजय घोरपडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील व माजी जि.प.अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रांत मोठे काम केले आहे. ग्रामपंचायतीला मध्यंतरी प्रधानमंत्री आवास योजनेचाही पुरस्कार मिळाला आहे. हे सर्व पुरस्कार ग्रामस्थांच्या सहकार्याचे द्योतक असून चांगल्या कामाची पावती आहे.

– डॉ. मधुकर निर्मळ, सरपंच पिंपरी निर्मळ

- Advertisment -

ताज्या बातम्या