Friday, April 26, 2024
Homeनगरपिंप्री अवघड शिवारात वंजारवाडीच्या तरूणाची आत्महत्या

पिंप्री अवघड शिवारात वंजारवाडीच्या तरूणाची आत्महत्या

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड टोलनाक्याजवळील शेतीच्या कडेला असणार्‍या लिंबाच्या झाडाला एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शनिशिंगणापूर रोडवर पिंपरी अवघड येथील टोलनाक्याच्या कडेला काल शनिवारी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान अशोक रामकिसन दराडे रा. वंजारवाडी, ता. नेवासा या इसमाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सकाळी शाळा सुटल्यानंतर या वस्तीवरील मुले घरी जाताना त्यांना मृतावस्थेत इसम आढळल्यामुळे त्यांनी घरच्यांना सांगितले. त्याचवेळी काही ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन त्या इसमाचा फोटो काढून सोशल मिडीयावर प्रसारित केला. यावेळी वंजारवाडी येथील त्यांच्या नातेवाईकांनी हा फोटो पाहिला व हा इसम आपलाच आहे, अशी खात्री झाल्यानंतर त्या ठिकाणाहून अनेक नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.

नातेवाईकांनी सांगितले, सकाळी नऊ वाजेपर्यंत अशोक घरीच होता. नऊनंतर त्याने मोटरसायकल नंबर एमएच 17 – एके 7207 या मोटरसायकलवर घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला. त्याचा मृतदेह सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान पिंपरी अवघड येथील टोलनाक्याच्या कडेला आढळून आल्यामुळे संपूर्ण घटना दोनच तासात घडल्यामुळे नेमके काय झाले? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या