Thursday, April 25, 2024
Homeनगरपिंपळवाडीला आणखी 6 पॉझिटिव्ह

पिंपळवाडीला आणखी 6 पॉझिटिव्ह

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील करोना रुग्णांची संख्या आता 23 वर पोहचली आहे. काल 26 आरटीपिसीआर अहवालापैकी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

- Advertisement -

अगोदर 17 जण आणि आता 6 असे एकूण 23 जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

पिंपळवाडी येथे पहिल्या टप्प्यात 17 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. नंतर त्यांच्या संपर्कातील 26 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. काल या 26 जणांचे अहवाल प्राप्त झाले. 26 पैकी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सहा जणांना नगर येथील सिव्हील हॉस्पिटलच्या कोव्हिड सेंटरला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या सहा जणांना लक्षणे असिमटॅमॅटिक आहेत. या सहा जणांच्या घरातील 10 जणांची काल मंगळवारी आरटीपिसीआर चाचणी राहाता तसेच पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये होणार आहे, अशी माहिती सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीधर गागरे यांनी दिली.

पिंपळवाडीत करोनाचा प्रादुर्भाव असला तरी काही नागरिक मास्क न लावता गावात फिरतात, असे आरोग्य यंत्रणेला आढळून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मास्कचा करावा, कारण नसतांना इतरत्र फिरु नये, असे आवाहन डॉ. गागरे यांनी केले आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क असुन ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे ही ते म्हणाले.

निघोजला एक जण पाझिटिव्ह!

सावळीविहीर प्राथमिक आरोगय केंद्रा अंतर्गत येत असलेल्या निघोज येथेही खाजगी लॅब मध्ये तपासणी केलेला एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता निघोज येथील रुग्णाची संख्या 6 वर पोहचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णास शिर्डी च्या डीसीएच ला उपचारासाठी दाखल केले आहे. त्या रुग्णासही लक्षणे असिमटॅमॅटिक आहेत, असे डॉ. गागरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या