Tuesday, April 23, 2024
Homeधुळेपिंपळनेर तहसील कार्यालय सील

पिंपळनेर तहसील कार्यालय सील

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

दि. 2 सप्टेंबरपर्यंत कार्यालयातील कामकाज बंद राहणार आहे.

- Advertisement -

येथील अपर तहसील कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कार्यालय सील करण्यात आले आहे. म्हणून याबाबत अपर तहसिलदार विनायक थविल यांनी आदेश दिले आहेत.

अपर तहसील कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तहसिलदारसह सर्व कर्मचार्‍यांचे भांडणे ता.साक्री कोविड सेंटरला स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले आहेत.

स्वॅबचा अहवाल येईपर्यंत दि. 2 सप्टेंबरपर्यंत तहसील कार्यालय बंद राहणार आहे. अशी माहिती अपर तहसिलदार विनायक थविल यांनी दिली आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे ग्राम समिती, पोलीस यंत्रणा, तहसील प्रशासनाने दि. 1 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू लागू केला आहे. जनता कर्फ्यूलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावातील सर्व व्यवहार बंद आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या