Friday, April 26, 2024
Homeधुळेकाम थांबल्याने पिंपळनेर-सटाणा रस्त्ता ‘धूळीत’

काम थांबल्याने पिंपळनेर-सटाणा रस्त्ता ‘धूळीत’

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

पिंपळनेर-सटाणा Pimpalner-Satana या रस्त्याच्या रुंदीकरणाचे Road widening काम थांबल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात Health endangered आले आहे. कारण रस्त्यावर दिवसभर प्रचंड धुळ Dust उडत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलसह इतर दुकानात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट ठेकेदाराने दुर्लक्ष केले. याबरोबच पांझरा नदीवरील जुन्या पुलावरही मोठमोठे खड्डे Pits पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. लवकरात लवकर रस्ता दुरूस्तीची मागणी Demand होत आहे.

- Advertisement -

सडक परिवहन एवंम राज्य मार्ग मंत्रालयद्वारा महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेन्टतर्फे (एम.एस.आर. टी.सी.) पिंपळनेर ते सटाणा रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम दि. 15 जानेवारी 2020 ला सुरुवात झाली. हा रस्ता 8 जुलै 2021 ला पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदाराला देण्यात आली होती. या रस्त्याची लांबी 42.5 व 73 किलोमीटर अंतर असून त्याची किंमत 193.14 करोड रुपये आहे. मात्र हा रस्ता कालावधीत पूर्ण तर झालाच नाही. मात्र जो पूर्वीचा चांगला रस्ता होता तो खोदून काढल्याने चालकांना आपला जीव मुठीत धरून कसरत करत प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर अनेक अपघात झाले.

अनेकांचे जिवही गेले आहेत. तर रस्ता खोदून काढल्याने रस्त्यावर धुळीचे मोठे साम्राज्य पसरले आहे दुचाकी चालकांना तर या धुळीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिंपळनेर, देशशिरवाडे, तहाराबाद, सटाणा शहरातून हा रस्ता जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दिवस-रात्र धुळ उडत असते. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यवसायिकांना याचा त्रास होत आहे. रस्ता तयार होण्याचा कालावधी संपून पाच महीने जास्त झालेत मात्र ठेकेदाराने व अधिकार्‍यांचे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावरून दररोज दोन ते तीन वेळा पाण्याच्या टँकरने पाणी मारले पाहिजे, जेणेकरून धूळ उडणार नाही. या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या