Thursday, April 25, 2024
Homeधुळेकापसेंची आत्महत्या की अन्यत्र बेपत्ता ?

कापसेंची आत्महत्या की अन्यत्र बेपत्ता ?

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

पिंपळनेर येथील रहिवासी व सुकापुर शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक राहुल कापसे हे 21 तारखेपासून बेपत्ता असल्याने

- Advertisement -

व पिंपळनेर येथील लाटीपाडा धरणावर बाईक लावून उजव्या कालव्याच्या गेटवर चप्पल दिसल्याने कदाचित त्यांनी आत्महत्या केली असावी यासंदर्भात पिंपळनेर परिसरात चर्चा सुरू होती.

या आशयाची मिसिंग त्यांच्या कुटुंबीयांनी पिंपळनेर पोलिसात दिले आज तीन दिवस होऊनही पत्ता न लागल्याने आज एस.डी.आर.एफ.ची टीम दाखल झाली सकाळपासून लाटीपाडा धरणात शोध कार्य सुरू झाले आहेत.

दुपारी तीन वाजेपर्यंत अथक परिश्रम करूनही मुख्याध्यापक कापसे यांचा तपास लागला नसल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाले आहेत.

तीन दिवस झाले आत्तापर्यंत त्यांची बॉडी पाण्यावर तरंगली असती किंवा कुजलेला वास आला असता. पण तसे वाटत नाही मग खरंच आत्महत्या केली का? एस.डी.आर.एफ. जवानांनी सायंकाळपर्यंत शोध सुरू ठेवले.

याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत पारस्कर यांनी माध्यमांना दिली. मात्र धरणावरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.

आत्तापर्यंत लाटीपाडा धरणावर आत्महत्येच्या अनेक घटना घडूनही पाटबंधारे विभागाने सी.सी.टीव्ही कॅमेरा बंद असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तीन आठवड्यापूर्वी एका शेतकर्‍याने याच ठिकाणी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हाही जनतेने कॅमेरे चालू करण्याचे शाखा अभियंत्यांना सांगितले होते.

परंतु दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेची देखील उकल होऊ शकली नाही. तसेच धरणावरचे स्ट्रीट लाईट लाईट देखील एक वर्षापासून बंद आहेत.

मुख्याध्यापक कापसे धरणावर खरंच आले का? त्यांनी आत्महत्या केली का? हे कॅमेर्‍याद्वारे स्पष्ट झाले असते, याकडे शाखा अभियंता एम.बी. पाटील याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

राहुल कापसे हे सुकापुर शासकीय आश्रम शाळेत मुख्याध्यापक आहेत. ते पिंपळनेर येथील हरिओम नगर मध्ये राहतात.

21 तारखेला सुकापुर आश्रम शाळेत गेले होते. श्री.कापसे यांनी जेवणाचा डबा व मोबाईल ठेवून लाटीपाडा धरण जवळ दीड ते दोन वाजेच्या सुमारास येऊन कॅनल जवळ बाईक लावून उजव्या कालव्याच्या गेटवर चढून दोन्ही चप्पल ठेवल्या असाव्यात.

आज तीन दिवस झाले तरी तपास न लागल्याने पिंपळनेर पोलिसात गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली. जिल्ह आपत्ती व्यवस्थापन पथकाने व पो.नि. चंद्रकांत पारस्कर आणि त्यांच्या पथकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध कार्य केले.

अशीही होतेय चर्चा

आपत्ती पथकाने प्रत्यक्ष धरणात उतरुन शोधकार्य करुनही श्री.कापसे यांचा मृतदेह सापडला नाही. याचा अर्थ त्यांनी धरणाच्या काठावर आपल्या वस्तू ठेवून आत्महत्येचा केवळ आभास निर्माण केला काय? अशीही चर्चा होते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या